श्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या भूमीमध्ये, राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा घेऊन, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. पूर्वेस सांगली, पश्चिमेस रत्नागिरी,उत्तरेस सातारा व दक्षिणेस सिंधुदुर्ग अशी जिल्ह्याची चतुःसिमा असून, जिल्ह्यांतून कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात. सन २००११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३८,७६,००१ असून त्यापैकी नागरी १२,३०,००९ व ग्रामीण २६,४५,९९२ लोकसंख्या आहे. जिल्ह्यात १२ तालुके असून १२ पंचायत समित्या, २ महानगरपालीका, १० नगरपालिका व १,०२५ ग्रामपंचायती आहेत.


डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही ‘डिजिटल ग्राम’ संकल्पना राबवली आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, विविध योजना यांची माहिती मिळेल.संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.