एकात्मिक पडिक जमीन विकास कार्यक्रम

एकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रमांतर्गत कृषि वनीकरण, कुरण विकास फलोत्पादन व जमिनीचा पर्यायी वापर यासाठी कृषि योग्य असलेल्या जमिनी व जलनिस्सारण वाहिन्या यावर सकेंद्रीत करणे इ. बाबींचा या योजनेमध्ये समावेश आहे.

कोल्हापूर जिल्हयामधील चंदगड तालुक्यात १५ पाणलोटांतील १५ गावांचा समावेश करण्यात आला असून सदरच्या गावांच्या प्रकल्प आराखडयांना मंजूरी देण्यात आलेली होती. तसेच चंदगड प्रकल्प ३१/३/२०११रोजी पूर्ण झालेला आहे. तसेच हरियाली मार्गदर्शक सूचनांनूसार हरियाली कार्यक्रमांतर्गत १)शाहूवाडी तालुक्यामध्ये सात पाणलोटांतील सात गावांचा प्रकल्पात समावेश असून त्यांच्या प्रकल्प आराखडयांना मंजूरी देण्यात आलेली आहे. २)गगनबावडा तालूक्यामध्ये सहा पाणलोट समाविष्ठ सहा गावांचा प्रकल्पात समावेशे असून त्यांच्या प्रकल्प आराखडयांना मजूरी देण्यात आली आहे. ३) पन्हाळा तालूक्यामध्ये ११ पाणलोटातील ११ गावांचा समावेश करण्यात आला असून सदर प्रकल्प आराखडयांना मजूरी देण्यात आलेली आहे.

सदर तिन्ही प्रकल्पाचा कालावधी डिसेंबर २०१२ पर्यत आहे. प्रकल्प अंतिम टप्यात आहे. यापैकी शाहूवाडी व गगनबावडा यांचे सर्व मंजूर पाचही हप्ते प्राप्त झाले असून पन्हाळा प्रकल्पाच्या पाचव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे.

कार्यक्रमाची उदिष्टये –

  • ग्रामीण भागातील पाणलोट क्षेत्रावर अवलंबुन असलेल्या जनतेचा आर्थिक विकास करणे
  • जमीन पाणी झाडे – झुडपे इत्यादी सारख्या नैसर्गिक संपत्तीचा कमाल वापर करणे व विकास करणे.
  • बचती आणि इतर उत्पन्नाभिमुख मानवी संसाधन वृध्दींगत करण्यासाठी इतर आर्थिक साधन संपत्तीचा विकास करणे.
  • जो वर्ग व स्त्रीया मत्ताहीन आहेत. अशा पाणलोट क्षेत्रातील तुटपूंजी साधन संपत्ती असणा-या आणि ज्यांना कोणताही लाभ होत नाही अशा वर्गाची सामाजिक व आर्थीक स्थिती सुधारणे. पाणलोट क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील असणा-या तसेच भूमीहीन लोकांसाठी कायम स्वरुपी उदर निर्वाहाचे संसाधन उपलब्धकरुन देणे.
  • पाणलोट प्रकल्पाची तरतूद –
  • विकास कामाकरिता – एकूण प्रकल्प किंमतीच्या ८५ टक्के रक्कम.
  • प्रशासनाकरिता – एकूण प्रकल्प किंमतीच्या १० टक्के रक्कम.
  • प्रशिक्षण व सामुहिक सुसज्जता करिता – एकूण प्रकल्प किंमतीच्या ५ टक्के रक्कम
  • उपचार कामे – जमीनीचा विकास करणे मृद व जलसंधारणाकरिता दगडी बांध, सीसीटी, झाडा – झुडपांचे बांध, शेततळी, कुरण विकास , वनिकरण इ. कामे.

कार्यक्रमाचे फायदे –

  • प्रशिक्षण सामुहिक सुसज्जता अंतर्गत पाणलोट क्षेत्रातील उपभोक्ता गट व बचतगटांचे क्षमता वृदींगत करणे.
  • विविध जलसंधारण व वनिकरण उपचरामुळे जमीनीची धुप थांबेल.
  • भुगर्भातील पाण्याची पातळी वाढून पाण्याचे दुर्भीक्ष कमी होईल.
  • मृद व जलसंधारणाची कामे कमी झाल्याने पाणी उपलब्धता वाढून प्रती हेक्टरी पिकांच्या उत्पादनात वाढ होईल.
  • वन व कुरण विकासामुळे चा-याची उपलब्धता होवून पशु पालन व दुग्ध व्यवसायात वाढ होईल.
  • वनिकरण कामामुळे पर्यावरण संतुलन होईल. इंधन, चारा इ. उपलबता वाढेल.
  • पाणलोट क्षेत्रातील लाभार्थीची आर्थिक पातळी उंचावेल.

मागील 2 वर्षाचा आढावा

Leave a Comment