केंद्र शासनाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 जिल्हा परिषद कोल्हापूरचा प्रथम क्रमांक – नवी दिल्ली येथील पुरस्कार वितरण कार्यक्रम

पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या नामांकनाकेंद्र शासनाकडील पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मार्फत जाहिर झाला होता, सदरचा पुरस्कार वितरण कार्यक्रम सी. सुब्रमन्यम हॉल, नॅशनल अग्रीकल्चरल सायन्स कॉम्पलेक्स, पुसा, नवी दिल्ली येथे आज दिनांक 23/10/2019 रोजी दुपारी 2  वाजता पार पडला. केंद्रीय मंत्री महोदय मा. श्री नरेंद्रसिंग तोमर, पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे हस्ते जिल्हा ‍परिषद कोल्हापूरच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.श्री सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र) श्री रविकांत आडसुळ यांनी प्रथम पारितोषिक पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमासाठी कर्नाटक, आसाम, छत्तीसगड या राज्यांचे ग्राम विकासमंत्री उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेस प्रथम पारितोषिकाचे प्रमाणपत्र व रक्कम रुपये 30 लाख बक्षीस स्वरुपात मिळाले आहे.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक आजारी कारणास्तव दिल्ली येथे कार्यक्रमास जाऊ शकल्या नाहीत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा परिषदेने विविध योजना व नाविन्यपुर्ण योजना चांगल्याप्रकारे राबविलेल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे प्रशासकीय बाबी, सर्वसाधारण सभा कामकाज, सभा कामकाजाचे रेकॉर्ड, सभेस जि.प. सदस्य यांची उपस्थिती इ. सह जिल्हा परिषदेकडील योजना व जिल्हा परिषदेने राबविलेल्या वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती याची पडताळणी करणेत आली होती. जि. प. च्या नाविन्यपुर्ण व्‍  वैशिष्टपूर्ण उपक्रमांमध्ये पर्यावरण पुरक गणेशोत्सव, पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करणे, स्वच्छ भारत मिशन, डिजीटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार,‍ ‍शिंगणापुर निवासी क्रिडा प्रशाला, रेकॉर्ड  वर्गीकरण अंतर्गत्‍  डिजीटल रेकॉर्ड रुम, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस,  आधारवड, कॅन्सर सर्व्हेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, वॉटर एटीएम, आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने या योजना चांगल्याप्रकारे राबविलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या  प्रस्तावाचे सादरीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने करणेत आलेले होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.सौ. शौमिका अमल महाडिक, उपाध्यक्ष मा.श्री सर्जेराव पाटील, श्री अंबरिषसिंह घाटगे  सभापती अर्थ व शिक्षण समिती , श्री सर्जेराव पाटील-पेरीडकर सभापती आरोग्य व बांधकाम समिती, श्री विशांत महापुरे सभापती समाजकल्याण समिती, सौ वंदना मगदुम सभापती महिला व बालकल्याण समिती, गटनेते श्री अरुणराव इंगवले, पक्षप्रतोद श्री विजय भोजे व सर्व सन्मानीय जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवि शिवदास, प्रकल्प संचालक श्री अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र) श्री रविकांत आडसुळ, सर्व  खातेप्रमुख व अधिकारी कर्मचारी वर्ग या सर्वांनी यासाठी प्रयत्न केले आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.सौ. शौमिका अमल महाडिक यांनी सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेस हे यश प्राप्त झाले आहे असे मनोगत व्यक्त करुन याबददल सर्वांचे अभिनंदन केले आहे.

 

Leave a Comment