प्रस्थावना :-
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १३३ नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधी गठीत केलेला आहे. मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने तिच्या मागील वित्तीय वर्षातील उत्पन्नाचे ०.२५ टक्के रक्कम अंशदान म्हणून जिल्हा ग्राम विकास निधीत डिसेबर पूर्वी जमा करणेची तरतूद आहे. ग्रामपंचायतीकडून अंशदान म्हणून प्राप्त झालेल्या निधीतून पंचायतीना अधिनियमातील अनुसूची एक मध्ये निदिष्ट केलेली विकास कामे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीची वि’मान आर्थिकस्थिती व कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेवून अंदाजपत्रकीय रक्कमेच्या ७५ टक्के प्रमाणे कर्ज मंजूर करता येते. ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची छाननी केलेवर कर्ज मंजूरीचे अधिकार स्थायी समितीस आहेत.