जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान  2020-21 अंतर्गत विविध प्रशिक्षणÛúÖµÖÔÛÎú´ÖÖÓ“Öê आयोजन केलेबाबत कोल्हापूर-03/11/2020.

 

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढावी आणि या संस्थांचे कामकाज अधिक परिणामकारकरित्या होण्याच्या दृष्टिने तसेच ग्रामपंचायतींना उपलब्ध असणारा निधीचा स्त्रोत व केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन ग्रामपंचायत विकास आराखडा परिपूर्ण होण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन 2020-21 च्या मंजूर वार्षिक आराखड्यामधील विविध प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत करणेत येणार आहे.

यामध्ये मा. जिल्हा परिषद सदस्य यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (67), जिल्हा परिषद खातेप्रमुख व जिल्हा स्तरावरील राज्य शासनाचे विविध विभागाचे विभागप्रमुख यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (20),  तालुकास्तरीय छाननी समिती सदस्य यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (120),  प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी) यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (134), पर्यवेक्षिका (एबाविसेयो) यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (134) सरपंच व ग्राम सेवक  यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (1888), पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (600), गणातील सर्व ग्रा पं सदस्य, ग्रामस्तरीय संसाधन गटाचे सर्व सदस्य व सर्व विभगांचे (जिप व राज्य शासन) ग्राम स्तरावरील सर्व कर्मचारी यांची एक दिवसीय कार्यशाळा (16500), गणातील सर्व ग्रामपंचायतमधील स्वयंसहाय्यता गटांच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य आणि समुह संसाधान व्यक्ती (CRPs) यांची एक दिवसीय कार्यशाळा (15450) इ. प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था, कसबा बावडा आणि ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत पूर्ण केले जाणार आहेत.

उपरोक्त नमुद प्रशिक्षण कार्यक्रमापैकी प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 04/11/2020 ते दिनांक-07/11/2020 या कालावधीत तसेच पर्यवेक्षिका (एकाविसेयो) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक-09/11/2020 ते 12/11/2020 ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कसबा बावडा कोल्हापूर येथे आयोजित करणेत आलेले आहेत.

 

 

Leave a Comment