जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर. 3 डिसेंबर, 2017 जिल्हा परिषद व रोटरी होरायझन यांचेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला-मुलींच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन.

दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस जगभर जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा होतो.

 

या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 3 डिसेंबर रोजी किंवा त्या दरम्यान सर्वत्र अपंगांसाठी मार्गदर्शन, वैद्यकीय तपासणी, चिकित्सा, सांस्कृत्तिक मेळावे,  अपंग व्यक्तींची उत्पादने व त्यांची प्रदशने, रोजगार मेळावे, जनजागृती इत्यादि स्वरुपाचे सामाजिक कार्यक्रम मोठया प्रमाणात आयोजित केले जातात.  अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवून अपंग व्यक्तींना सर्व सामान्य व्यक्तींच्या बरोबरीने आपले जीवन जगता यावे.  यासाठी प्रेरित केले जाते व समाजाचे प्रबोधन केले जाते.  या दिनाच्या निमित्ताने दरवर्षी कोल्हापूर जिल्हयातील सर्व अपंगांच्या कायमस्वरुपी अनुदानित/विना अनुदानित विशेष शाळांच्यामधील विद्यार्थ्यांच्या (8 ते 25 वयोगटातील) क्रिडास्पर्धाचे आयोजन केले जाते.

 

जिल्हा स्तरावरील यशस्वी विद्यार्थीं (खेळाडू) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविला जातो.  कोल्हापूर जिल्हयातील अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवून अनेक विक्रम प्रस्तापित केले आहेत.  यामध्ये कोल्हापूरचा नावलौकिक कायम आहे.  या विद्यार्थ्यांच्या यशामागे अपंग शाळांतील क्रिडा शिक्षक व कर्मचारी यांचे सातत्य पूर्ण प्रयत्न, मार्गदर्शन हेही तितकेच मौलाचे आहे.

 

दरवर्षीं जिल्हास्तरीय स्पर्धांचे नियोजन हे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,कोल्हापूर यांच्यामार्फत केले जाते.  यावर्षी रविवार, दिनांक 3 डिसेंबर 2017 रोजी पोलिस ग्राऊंड, कसबा बावडज्ञ, कोल्हापूर या ठिकाणी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंत स्पर्धा होणार आहेत.  या स्पर्धेचे 300 विद्यार्थीं, 150 कर्मचारी जिल्हयातून सहभागी होत आहेत.  या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन हे जिल्हा समाजकल्याण कार्यालय,जिल्हा परिषद, कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी भोजन, नाष्टा, बक्षिय इत्यादि सुविधा क्लबमार्फत करण्यात आली आहे.

Leave a Comment