जि.प. अधिकारी कर्मचारी यांची तज्ञांमार्फत आरोग्य तपासणी

नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जि.प. कोल्हापूर च्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका  अमल महाडिक यांच्या संकपल्पनेतून आणि मा. डॉ कुणाल खेमनार, यांच्या मागदर्शनाखाली  जिल्हा परिषदेच्या  सर्व अधिकारी कर्मचारी  यांची तज्ञांमार्फत तपासणी  करण्यात आली.  सदरचे तपासणी शिबीरांचे आयोजन जिल्हा परिषद कोल्हापूर व अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने  करण्यात आले होते.  या  शिबीरांचे उद्घाटन  स्व. वसंतराव नाईक समिती  सभागृह जि.प. कोल्हापूर येथे  धनवंतरी मूर्तीच्या पूजेने करण्यात आले. या प्रसंगी  मा. इंद्रजित देशमुख. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ श्रीकांत कोले,  डॉ. हरिष जगताप,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.ग्रा.वि. यं,  श्री. भालेराव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी , ग्रामपंचायत ,  डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी,  डॉ सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  तसेच अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलेचे तज्ञ डॉक्टर डॉ अंगराज सावंत, अस्थिरोग तज्ञ, डॉ. अमित पोरवाल, एम.डी. मेडिसीन, श्री. अकिल शेटटी, मुख्य प्रशासन अधिकारी व  स्टाफ उपस्थित होता.

प्रस्ताविकांत बोलतांना डॉ उषादेवी कुंभार म्हणाल्या की,  आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नातून शिबीर आयोजन झाले आहे. संसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु असांसर्गीक रोगाचे प्रमाण वाढत आहे. जसे हदय रोग, मधुमेह, कॅन्सर , मानसिक आजार इ. असे म्हणाल्या. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी व्यसनांपासून दूर रहावे असे या प्रसंगी बोलतांना डॉ. हरिष जगताप यांनी भावना व्यक्त केली.

आपल्या मागदर्शनपर व्याख्यानात बोलतांना प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. श्रीकांत कोले म्हणाले की,  हदयरोग , उच्च रक्त दाब, मधुमेह का होतो याचे अदयाप निदान झाले नाही. हदयरोग, अस्थिरोग, इतर असंसर्गजन्य आजारावर अधुनिक तंत्रज्ञानाने उपचार माफक दरामध्ये अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये उपलब्ध आहेत. हे रोग होवू नये या साठी प्रत्येकांनी व्यसनापासून दूर राहणे, तणांवमुक्त जीवनशैली अंगीकरणे तसेच नियमित व्यायाम आवश्यक असे अध्यक्षीय भाषणांत बोलतांना  मा. इंद्रजित देशमुख नमुद केले.

शिबीरामध्ये  एकुण 300  अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणी  करण्यात आली. यामध्ये  हिमोग्लोबीन तपासणी -300     रक्तातील साखरेचे प्रमाण – 300 इसीजी- 170   यापैकी   संदर्भ सेवा एकुण 90 रुग्णांना देण्यात आली असून  मध्ये  2 डी इको, मधुमेह 46, टीएमटी-02,  एक्स रे 05, प्रयोगशाळा तपासणी 37, सोनोग्राफी03 रुग्ण आहेत. शिबीर  यशस्वी करणे साठी  डॉ सुहास कोरे, डॉ स्मिता खंदारे,  श्री. पाटील,  श्री भंडारी  यांनी  परिश्रम घेतले तर अथायु हॉस्पीटलच्या वतीने  श्री. अनिरुध्द सुतार,  श्री प्रकाश पाटील, सुरेखा जाधव,   दिपाली  जगताप  यांनी परिश्रम घेतले

जिल्हा आरोग्य अधिकारी

                                                            जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

Leave a Comment