जुन्या वस्तू -कपडे ,चप्पल,बुट,पर्स,खेळणी संकलित करून गुंज या सामाजिक संस्थेस प्रदान कार्यक्रम.

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहीला आहे.या वर्षीदेखील मा.अध्यक्षा,जि.प.कोल्हापूर यांचे संकल्पनेतून जुन्या वस्तू -कपडे ,चप्पल,बुट,पर्स,खेळणी ,ई – कचरा संकलित करून दान करणे,असा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. दि.7 ते 16नोव्हेंबर,2017 पर्यंत जिल्हापरिषदेकडे या वस्तूंचे संकलन करून ते ‘गुंज’ या सामाजिक संस्थेला दान करणेचा सामाजिक उपक्रम जिल्हा परिषदेने यशस्वीरित्या राबविला आहे.या वस्तूंपासून वापरा योग्य नवीन वस्तू तयार करून त्या दुर्गम भागातील किंवा गरीब लोकांना वाटप केले जाणार आहेत.वर्ष 2015 मध्ये जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेमार्फत याचं पध्दतीने जुने कपडे संकलन करून ते आनंदवन या सामाजिक संस्थेस दान केले होते.त्याप्रमाणेचं यावर्षी ही हा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने हातामध्ये घेतला आहे.

या उपक्रमास कर्मचा-यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उपक्रम वेळेत पूर्ण व्हावा यासाठी सर्व विभागांना वस्तू दान करणेसाठी वेळ निश्चित करून देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे सर्व विभागांनी आपली कामगिरी पूर्ण केली आहे.पंचायत समिती स्तरावरती देखील या पध्दतीने जुने कपडे संकलन करून हे साहित्य जिल्हा परिषदेकडे सादर केले आहे.या संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि पॅकिंगचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांची नियुक्ती करण्या आली होती.त्याप्रमाणे प्राप्त सर्व साहित्यांचे पॅकिंग पूर्ण करण्यात आले आहे.तब्बल दोन ट्रक भरतील इतके साहित्य या उपक्रमातून जमा झाले आहे.

आज  रोजी दुपारी 3.00वा साहित्य भरलेले ट्रक गुंज या संस्थेकडे रवाना होणार आहे.सदर साहित्य गुंज या संस्थेस पाठवण्यासाठी दोन ट्रक च्या व्यवस्थेची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने उचलली आहे.मा.सौ.शौमिका महाडीक ,अध्यक्षा,जि.प.कोल्हापूर ,यांचे हस्ते श्रीफळ वाढवून हे ट्रक गुंज या संस्थेकडे रवाना झाले.यावेळी या उपक्रमामध्ये मोलाचे योगदान दिलेबदद्ल जिल्हा परिषद कर्मचा-यांचे प्रातिनीधक स्वरूपात  प्रशस्तीपत्र देवून आभार व्यक्त करण्यात आले.   यावेळी मा.श्री.सर्जेराव पाटील,उपाध्यक्ष,जि.प.कोल्हापूर,मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.श्री.इंद्रजित देशमुख,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.श्रीम.सुषमा देसाई,उप.मु.का.अ(पा.व स्व.) आणि जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी यांचे उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

———————————–

जिल्हा परिषद, कोल्हापूर
जिल्हा पाणी  स्वच्छता मिशा (DWSM)
जुने  कपडे वस्तू संकलन अहवाल (बॉक्स मध्ये)
साड्याशर्टपँटलहाा मुलांचे  ड्रेसस्री कपडेचप्पलस्वेटरबॅगखेळणीइलेक्ट्रॉाकि
5954348951810543

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

Leave a Comment