दीनबंधू ग्रुप, मुंबई यांचेकडून जिल्हा परिषदेच्या ३० शाळांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण

दीनबंधू ग्रुप, मुंबई यांचेकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांना नुकतेच शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वितरण करणेत आले. सोमवार दि. १३/११/२०१७ इ. रोजी राधानगरी तालुक्यातील वि.मं. भित्तमवाडी, गवशी पाटीलवाडी, म्हासुर्ली, खामकरवाडी, कोते, देऊळवाडी, बुरंबाळी, गुडाळवाडी, कुडुत्री, आणाजे, खिंडी व्हरवडे, बुजवडे, धामणवाडी, मांगेवाडी व मालवे या १५ शाळांना मोफत साहित्याचे वितरण करणेत आले. तसेच मंगळवार दि. १४/११/२०१७ इ. रोजी गगनबावडा तालुक्यातील वि.मं. लोंघे, साखरी, वेतवडे, मणदूर, अणदूर, धुंदवडे, जर्गी, सांगशी, शेळोशी, मांडुकली, असंडोली, कोदे बुद्रुक, ज्ञानसाधना तिसंगी, आश्रमशाळा पळसंबे व परशुराम हायस्कूल गगनबावडा या १५ शाळांना साहित्याचे वितरण करणेत आले. दीनबंधू ग्रुपकडून सदर शाळांमध्ये जाऊन शालेय मुलांच्या वयोगटानुसार उपयुक्त्‍ असे शैक्षणिक व क्रीडा साहित्य वितरीत करणेत आले.

दीनबंधू ग्रुप हा मुंबई व कोल्हापूर येथील साधारण ३० उद्योजकांचा ग्रुप मुंबईस्थित उद्योगपती मा. किर्ती मेहता यांनी तयार केला असून त्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरू आहे. यापूर्वी या ग्रुपकडून कागल व राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करणेत आले आहे. शाळांना वितरीत करणेत आलेल्या साहित्यामध्ये शालेय मुलांकरीता वाचनीय पुस्तके, चित्रकार्डे तसेच क्रिकेट, फुटबॉल, कॅरम इ. अशा साधारणपणे रू. ७०००/- किंमतीच्या साहित्याचा समावेश आहे. सदर साहित्य वितरण प्रसंगी दीनबंधू ग्रुपचे संस्थापक मा. किर्ती मेहता, मा. अरविंद मणियार, मा. डाहयाभाई पटेल, मा. संपत मोरे, मा. श्रीधर रामदुर्गकर, मा. राजीव पाटील, मा. माधव कुलकर्णी यांचेसह शिक्षण समिती सदस्य मा. भगवान पाटील, मा. विनय पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. डी. ए. पाटील, जिल्हा समन्वयक श्री. बी. बी. पाटील, केंद्रप्रमुख श्री. गुरव यांचेसह सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण समिती सभापती व सदस्य, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा समन्वयक यांचे सहकार्य लाभल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांना साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वी झाला असून आगामी काळात जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त शाळांना साहित्य वाटपाचे नियोजन असल्याचे दीनबंधू ग्रुपच्या वतीने स्पष्ट करणेत आले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या विधायक उपक्रमाबाबत दीनबंधू ग्रुपच्या प्रतिनिधींचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती मा. अंबरिषसिंह घाटगे व शिक्षणाधिकारी मा. सुभाष चौगुले यांनी स्वागत करून यथोचित गौरव केला. जिल्हा समन्वयक श्री. बी. बी. पाटील यांनी दीनबंधू ग्रुपकडून जिल्हा परिषद शाळांना साहित्य वितरणाच्या उपक्रमाबाबत सर्व सदस्यांचे आभार मानले.

 

                                                                                                             शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                                                                            जिल्हा परिषद कोल्हापूर

Leave a Comment