प्रसव वेदना,पुराचे थैमान आणि शासकीय यंत्रणाचा समन्वय: माता व नवजात बालक सुखरुप

प्रसव वेदना सुरु झाल्याने  साखरी ता गगनबावडा येथील गरोदर माता नीता रामचंद्र खंदारे ही दि. 30 जुलै 2019 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली. पाच वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी व परिचारिका प्रसुती सुखरुप होणेसाठी प्रयत्न करीत होते.  परंतु पावसाचा जोर वाढत असल्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली होती.  अशा परिस्थतीमध्ये  मातेची स्थिती गंभीर होण्याचा धोका असल्यामुळे व प्राथमिक आरोगय केंद्रामध्ये अत्याधुनिक यंत्रणा नसलेमुळे वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी कोल्हापूरला संदर्भीत करण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लोंघे-किरवे दरम्यान 200 मीटर लांब रस्त्यावर पाणी होते. परिस्थतीचे गांभिर्य  ओळखून वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा अपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारुख देसाई  यांना कळविले त्यांनी जिल्हासाथ रोग कक्षातील कार्यरत श्री संजय सोनवणे यांना माहिती देवून निवडे व कळे प्रा आ केद्राकडे संपर्क साधला.  त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा क्षणांचाही विलंब न लावता यंत्रणा कार्यान्वीत झाल्या. गगनबावडा  पोलिसांचे पथक  प्राथमिक आरोग्य निवडे येथे तत्काळ पोहचले.  108 ॲम्ब्युलन्स चे  वैद्यकीय अधिकारी डॉ मानाजी पाटील, पो.नि. श्री चौगले, पो कॉ. वीर , प्रा आ केंद्राकडील वै.अ. डॉ कारंडे, आरोग्य सहाय्यक श्री अरुण मेथे,  आरोगय सेवक संभाजी दुर्गुळे,  ढेळेकर यांच्या मदतीने गरोदर मातेस 108 ॲम्ब्युलन्स मधून किरवे गावाजवळ आणले. तेथून स्टे्रचर वरुन सुमारे 200 मीटर अंतर कमरे एवढया पाण्यातून लोघे  येथे आणले . तेथे कळे ता पन्हाळा स पो नि इंगवले अधिच 108 ची ॲम्ब्युलन्स सह उपस्थित होते. गरोदर मातेची पुन्हा एकदा प्राथमिक आरोग्य कळे ता पन्हाळा येथे तपासणी करण्यात आली त्यानंतर जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

जिल्हा अपत्ती कक्ष , जिल्हा पोलिस यंत्रणा , 108 ॲम्ब्युलन्स सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे, कळे कडील अधिकारी कर्मचारी, यांच्या संर्तकते मुळे सर्व शासकीय यंत्रणाच्या समन्वयामुळे या गरोदर मातेची सुखरुप सुटका झाली असून या गरोदर मातेने मुलास जन्म दिला असून बाळ व बाळंतीण यांची प्रकृती चांगली आहे. या मोहिमेत मध्ये सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्त्ल, आरोग्य सभापती श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी केले आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळे योगेश यांनी सांगितले.

 

 

Leave a Comment