जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून जून 2014 पासून चालविल्या जाणा-या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर या प्रशालेस मा. श्री. अजित भोसले, एअर मार्शल (निवृत्त), तथा सदस्य युपीएसी, न्यू दिल्ली यांनी आज दिनांक 20/04/2018 रोजी सदिच्छा भेट देऊन क्रीडा प्रशालेच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रथम क्रीडाप्रशालेचे प्रशासन अधिकारी व मुख्याध्यापक यांनी मा. श्री. अजित भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनतर क्रीडा प्रशालेचा हेतू, प्रशालेचे स्वरुप, प्रशालेमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणा-या सोई सुविधा तसेच खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्थरावर केलेल्या कामगिरीचा आढावा याची सविस्तर माहिती पीपीटी व डॉक्यूमेंट्री व्दारे सादर करणेत आली.
त्यानंतर मा. श्री. अजित भोसले यांनी क्रीडाप्रशालेतील आवारातील क्रिडांगण, वस्तीगृह, व्यायामशाळा, भोजनगृह, आभ्यासिका या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जि.प. मार्फत सुरू केलेल्या हा अभिनव उपक्राम पाहून ते प्रभावित झाले. त्यानंतर क्रीडा प्रशालेकडील प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक, क्रीडा प्रशिक्षक यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेने राबविलेल्या या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, मु.ले.व वि.अ., शिक्षणाधिकारी यांचे कौतूक करुन शाळेची प्रगती अतिशय चांगली असून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.