महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोै.शौमिका महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार व जिल्हा आरोग्य अधिकारी सौ.उषादेवी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यामध्ये कॅन्सर कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिम योजने अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर व ॲपल सरस्वती हॉस्पीटल यांच्या विद्यमाने मुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅन्सर शिबीर नुकतेच संपन्न झाले.
या शिबीराचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका अमल महाडिक, यांच्या शुभहस्ते व मा. श्री. महेश चौगुले, जि. प. सदस्य, मा. सौ. वंदना पाटील, जि.प. सदस्या यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना मा. सौ. शौमिका महाडिक म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, आपल्या मानसिक व शाररिक आरोग्य कडे लक्ष दयावे. शरीर , मन, समाज सुस्थित असले तर सर्वांचे आरोग्य चांगले राहते. प्रत्येकांनी खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी, स्वच्छता, चांगला सुसंवाद ठेवावा असे नमुद केले.
प्रास्ताविकात तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.डॉ.जी.डी.नलवडे यांनी करवीर तालुक्यातील 425 आशा स्वयंसेविकांच्या मार्फत फेब्रुवारी मध्ये घरोघरी भेटी देवून कॅन्सर विषयक सर्व्हेक्षणात 2710 संशयित रुग्ण आढळले असून यासर्वच रुग्णांची वैद्यकीय अधिका-यामार्फत प्राथमिक तपासणीनंतर तालुक्यात आयोजित करण्यात येत असलेल्या कॅन्सर निदान चिकित्सासाठी आयोजित 6 शिबीरातून तपासणी करणेत आली असून. एकुण 621 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांपैकी संशयीत कॅन्सर रुग्णांमध्ये तोडांचा -19 , गर्भाशय – 24 , स्तनांचा – 32 , इतर – 88 एकुण 160 रुग्ण संशयीत कॅन्सरचे आहेत. एकुण 73 संशयीत रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे. रुग्णांची तपासणी व चाचणी ॲपल सरस्वती हॉस्पीटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्याकडे करणेत येऊन कॅन्सर उपचार कराव्या लागणा-या रुग्णांना 15000 पर्यत अनुदान देण्यात येणार असलेचे विषद केले.
ॲपल सरस्वती हॉस्पीटलचे कॅन्सर तज्ञ डॉ.निखील गुळवणी यांनी सद्याच्या युगात खाण्या-पिण्याच्या बदल्या सवयी,युवक आणि तरुणांमधील तंबाखु,मावा,गुटखा यांसारख्या व्यसनांचे वाढते प्रमाण,महिलांमधील आरोग्याच्या समस्यांमधील संकोचितपणा व होणारे दुर्लक्ष,सोशिकता तसेच त्यांच्यामधील वाढते मिसरीचे व्यसन प्रमाण तसेच रासायनिक खते आणि किटक नाशकांचा अतिरिक्त वापर यामुळे 1995 सालाच्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण 200 पटीने वाढले असून यासाठी सर्वानींच एकत्र लढा देणे गरजेचे असून यासाठी जिल्हा नियोजन मंडळ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी उचललेले पाऊल निश्चितच उपक्रमशिल आणि नाविन्यपूर्ण असून कॅन्सर रुग्णांना दिलासादायक असल्याचे नमूद केले.
सदर शिबीरासाठी पं.स. सौ शौभा राजमाने, सौ. सरीता कटेजा, ग्रा.प. मुडशिंगीचे सरपंच सौ. सुरेखा गवळी, उपसरपंच मा. तानाजी पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुभाष इंदूलकर यांनी केले व आभार डॉ एफ ए देसाई यांनी मानले. या शिबीर आयोजनसाठी वै.अ. डॉ. मुल्ला मॅडम व सर्व कर्मचारी , आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.
——————————————————————————————