राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान नियोजित नाविन्यपुर्ण उपक्रम

१) इलेक्ट्रॉनिक वजन काटा :-जिल्हयांतर्गत ग्रामपंचायतकडील १० टक्के महिला बाल कल्याण निधी, पंचायत समिती सेस फंड, लोकसहभागाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकंाची अचूक वजने घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे उपलब्ध करुन घेणे. तसेच जुन्या वजन काटयांचे कॅलिबे्रशन करुन घेण्याचे नियोजन करुन घेण्यात आले आहे.

२) बालकांचे पोषण श्रेणी बाबतचे कार्ड :- जिल्हयांतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रातील SUM / MUW / SAM / MAM बालकांचे आरोग्य पोषण कार्ड तयार करुन त्यांची आरोग्य तपासणी, लसीकरण, प्रत्येक महिन्यातील वाढ-घट, श्रेणीतील बदल आहाराची वारंवारता याबाबतच्या नोंदी घेणे व त्याचा पाठपुरावा करणे.

३) संभाव्य कुपोषीत बालकांचा शोध घेणे:- ( विशेष गरजा असलेली बालके) अपुर्‍या दिवसात जन्मलेले बाळ, जुळी बालके, जन्मत: कमी वजनाची मुले अशा बालकांचा शोध घेवून ती कुपोषणामध्ये येवू नये, यासाठी प्रथमपासुनच त्यांची काळजी घेणे.

४) गरोदर मातांचे नोंदणी कार्ड :- जिल्हयांतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी केल्या जाणार्‍या गरोदर महिला, यांची वजन, HB (सुरुवातीला/पहिल्या भेटीच्या वेळी) तपासणी करुन त्याची नोंद घेणे व कमी वजन वाढ, HB असणार्‍या मातांकडे अधिक लक्ष देणे. १) लोहगोळया, २) आहार, ३) वजन वाढीवर लक्ष ठेवणे

५) मातांचे सक्षमीकरण :-

(१) SUM / MUW / SAM / MAM असलेल्या बालकांच्या मातांचे अंगणवाडी स्तरावर उपकेंद्र स्तरावर बैठका आयोजित करुन दशपदी बाबत मार्गदर्शन/प्रशिक्षण करणे. सक्षमीकरण झालेल्या मातांची स्पर्धा घेणे इतर मातांना मार्गदर्शन करणेस विनंती करणे (ज्ञानदान) (स्वछतादूताच्या प्रमाणे),अंमलबजावणी बाबतचा पाठपुरावा करणे. तसेच अंगणवाडी स्तरावर, उपकेंद्र स्तरावर प्रत्येक बालकांच्या घरामध्ये सदर दशपदींचे भित्तीपत्रके देणे.

(२) बालकांच्या पोषणविषयीं मातांची क्षमता वाढविणे:- कमीत कमी खर्चात घरामध्ये उपलब्ध असणार्‍या अन्न धान्याच्या माध्यमातून पौष्टीक पदार्थ बालकांसाठी कसे तयार करता येतील याबाबतचे मातांचे ज्ञान वाढविण्यासाठी आणि बेकरी व बाजारु पदार्थ न देता त्याच प्रकारचे घरगुती पदाथे कसे तयार करता येईल याबाबत स्पर्धांचे आयोजन करणे. उदा:- मॅगी ऐवजी घरगुती शेवयांचा उपमा, खीर, शिरा, हळीवाचे लाडू, भातामध्ये योग्य प्रमाणात खाऊचा चुना टाकणे, प्रक्रियायुक्त सोयाबिनचे दुध तयार करणे. कडधान्यांची भेळ, पार्ले बिस्किट एवजी रोट तयार करणे, बाजारु फरसाणापेक्षा घरगुती शेंगदाणे व मसुरचे फरसाणा तयार करणे.

(३) यशोदामाता/लाडकी आजी योजना :- मातेऐवजी बालकांचा संभाळ करणार्‍या स्त्रींयांचे (उदा. काकी, मावशी, आजी इ.) सक्षमीकरण करणे व ज्ञानदान करणेसाठी प्रोत्साहीत करणे.

६) कायमस्वरुपी व हंगामी परसबाग विकसित करणे:- अंगणवाडी स्तरावर सेविका यांचे मार्फत पालकांना परसबागेमध्ये शेवगा, अळू, लिबुं, आवळा इत्यादी सारख्या कायमस्वरुपी उपलब्ध होणार्‍या पौष्टिक भाज्या लावण्याबाबत प्रवृत्त करणे.

७) अंधश्रध्दा निर्मुलन :- गरोदर महिलांचा आहार लसीकरण, त्यांच्या विश्रांतीच्या वेळा, स्तनदा मातांचा आहार, स्तनपानाचा कालावधी, बालकांचा आहार व संगोपन याबाबत असणार्‍या समाजातील जुन्या व चुकीच्या रुढी, परंपरा, अंधश्रध्दा याबाबत आंणवाडी सेविका, किशोरी, बचत गटाच्या महिला यांचे मार्फत पथनाटय, कोपरा बैठका यांच्या माध्यमातून जनजागृती करणे.

८) कुपोषित बालकांच्या घरी गृहभेटी :-अंगणवाडी केंद्रातील SUM / MUW / SAM / MAM या बालकांच्या घरी बाळकोपरा, आहाराची बारंवारीता, स्वच्छता याबाबत गृहभेट देवून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचेमार्फत घरी दिला जाणारा आहार किती वेळा दिला जातो व तो किती घेतला जातो, योग्य पोषण मुल्य असलेला आहार आहे कि नाही याची चौकशी करुन त्याची नोंद घेणे. सदर मुलांच्या घरात दिवसातून ६ ते ७ वेळा आहार देणेबाबतचे वेळापत्रक तयार करुन लावणे. तसेच त्यामध्ये कमी वजनामुळे बालकांचे होणारे संभाव्य नुकसान,आयोडिनयुक्त मिठाचा वापर न केल्यामुळे होणारे संभाव्य परिणाम याबाबतची माहिती चार्टमध्ये देणे.

९) आरोग्य सल्ला संपर्क केंद्र (टोल प्री फोन नंबर: १०२ व १०४):- या ठिकाणी आहार, आरोग्य व संदर्भ सेवेविषयी मोफत सल्ला केंद्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

१०) खाजगी बालरोगतज्ञांच्या सेवा :- खाजगी बालरोगतज्ञांच्या सेवा त्यांचे खाजगी दवाखान्यात विशेष गरजा असलेल्या बालकांना मोफत उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करणे.

Leave a Comment