जाहिरात
सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, ता.गगनबावडा कडील रिक्त पदाची भरती
कोल्हापूर जिल्हयातील गगनबावडा गटामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेमार्फत नवोदय विदयालयाचे धर्तीवर कस्तुरबा गांधी बालिका विदयालय इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणा-या शाळाबाहय व अर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील मुलींसाठी निवासी स्वरुपात सुरू आहे. या विदयालयाच्या वसतीगृहाकडील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत येत आहे. सदरची पदे पूर्णपणे हंगामी स्वरुपाची असून कंत्राटी स्वरुपावर सहा महिने कालावधीसाठी भरणेत येणार आहेत. नियुक्ती कालावधीत काम समाधानकारक असलेस पुढील नियुक्तीबाबत विचार करणेत येईल. कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाकरीता नियुक्ती करणेत आलेल्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता / व्यावसायिक अर्हता व मासिक परिश्रमिक वेतन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मंुबई यांनी निश्चित केलेप्रमाणे राहील. त्याबाबत जे आदेश वरिष्ठ कार्यालयाचे प्राप्त होतील ते पाळणे संबंधितांना बंधनकारक राहील.
अ. क्र. | पदाचे नांव | पदांची संख्या | आरक्षण | शैक्षणिक अर्हता व अनुभव | पारिश्रमिक (मानधन- कंत्राटी पद्धतीने) |
1 | गृहप्रमूख | 1 | खुला महिला | बी.ए.बी.एड्./बी.एस्सी.बी.एड्.+2 वर्षाचा अनुभव | 25000/- |
2 | लेखापाल | 01 | खुला महिला | बी.ए./बी.कॉम+एम.एस.सी.आय.टी.+ मराठी टायपिंग 30 w.p.m. + इंग्रजी टायपिंग 40 w.p.m. (बी.कॉम पदवीधर,संगणकाचे सखोल ज्ञान ü व लेखाविषयक कामकाजाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणा-या व्यक्तीस प्राधान्य.) | 7000/- |
3 | सहा.स्वयंपाकी | 1 | अनु.जाती महिला | साक्षर | 4500/- |
4 | शिपाई | 1 | खुला महिला | सातवी पास | 5000/- |
सदर पदांच्या अटी व शर्ती –
1) सदरचे पद कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाच्या प्रकल्प कालावधी साठी पुर्णपणे हंगामी स्वरुपाचे असून सदर पदांस शासन सेवेचे नियम लागू नाहीत.
2) सदर पदांवरील नेमणूक त्यांचे नावासमोर दर्शविलेप्रमाण्े एकत्रित पारिश्रमिकावर सहा महिन्याच्या कालावधीसाठी करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपाच्या करणेत येणार आहेत.
3) वयोमर्यादा दि. 01/04/2017 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पुर्ण व कमाल वयोमर्यादा सर्वसाधारण
उमेदवारांसाठी 33 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 38 वर्षे राहील.
4) आरक्षण प्रवर्गानुसार रिक्त पदांवर उमेदवार न मिळालेस सदर पदावर अन्य प्रवर्गातील उमेदवारांची निवड करणेचा
अधिकार निवड समितीस राहील.
5) नियुक्त झालेल्या उमेदवारानी विहित नमुन्यातील सेवा करारनामा करून देणे बंधनकारक राहील.
6) सदरचे विद्यालय निवासी स्वरूपाचे असलेने गृहप्रमूख पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी विद्यालयात निवासी
राहणे
बंधनकारक आहे. व अन्य पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक राहिल.
7) उमेदवारानी अर्ज मा. सदस्य सचिव, कस्तुरबा गांधी बालिका विदयालय निवड समिती, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा
परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर यांचे नावे दि.10 /04/ 2017 पर्यत करणेचा आहे.
8) उमेदवारानी अर्जाच्या लखोटयावर पदाचे नाव व कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाकडील रिक्त पदासाठी अर्ज असे
सुस्पष्टपणे नमूद करावे.
9) अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रती जोडाव्यात.
10) निवड करणेबद्दलचे सर्व अधिकार निवड समितीस राहतील.
11) उमेदवारास लेखी परिक्षा अथवा मुलाखतीस उपस्थित राहणेबाबत दैनिक भत्ता तसेच प्रवास भत्ता देय नाही.
12) सदर पदांसाठी देणेत आलेली जाहीरात अथवा मुलाखतीचा कार्यक्रम काही तांत्रिक अडचण उदभवल्यास स्थगित अथवा
रद्द करणेचा अधिकार निवड समितीस राहील. याबाबत कोणत्याही प्रकारची हरकत विचारात घेतली जाणार नाही.
ठिकाण :- कोल्हापूर
दिनांक :- 29 /03/2017.
सही/- सही/-
सचिव जिल्हा निवड समिती अध्यक्ष जिल्हा निवड समिती कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा. तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.) गगनबावडा. तथा जिल्हाधिकारी, कोल्हापूर
जिल्हा परिषद, कोल्हापूर
आवेदन पत्राचा नमुना
सर्व शिक्षण अभियान,शिक्षण विभाग (प्राथमिक)जिल्हा परिषद कोल्हापूर
कस्तुरबा गांधी बालिका विदयालय गगनबावडा कडील रिक्त पदाच्या भरती बाबत
अर्ज
सेवायोजनÖ कार्यालय
नोंदणीß क्रमांक
प्रति मा.सदस्य सचिव
कस्तुरबा गांधी बालिका विदयालय निवड समिती तथा
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांगाळा पार्क,कोल्हापूर
विषय – कस्तुरबा गांधी बालिका विदयालय गगनबावडा कडील रिक्त पदाच्या भरती बाबत अर्ज
- उमेदवाराचे नांव (देवनागरी)
आडनांव प्रथम ————————————————————————————————
- लिंगÖ : पुरुष स्त्री
- पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर:- ————————————————-
—————————————————————————————–
4) कायमचा पूर्ण पत्ता : —————————————————————————————————————-
5) जन्मतारीख : अंकी
अक्षरी ———————————————-
6) दिनांक : 01/04/2017 रोजी उमेदवाराचे वय –
वर्षे महिने दिवस
7) जात व प्रवर्ग :
8) विशेष आरक्षण असलेस
9) शैक्षणिक अर्हता :
अ.क्रं. | उर्तीर्ण झालेली परिक्षा | युनिर्व्हसिटी बोर्ड | घेतलेले विषय | मिळालेले शेकडा गुण | उर्तीर्ण झालेले वर्ष |
| |||||
10) अनुभव :
ज्या संस्थेत काम केले आहे त्या संस्थेचे नांव | कालावधी | कामाचे स्वरूप | शेरा | |
पासून | पर्यंत | |||
|
प्रतिज्ञापत्र
वर नमूद असलेला तपशील माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे. नमूद केलेली माहिती चुकीची अगर खोटी आढळलेस मी कारवाईस पात्र राहीन व माझी केलेली नेमणूक रद्द होईल याची मला पूर्ण जाणीव आहे.
उमेदवाराची स्वाक्षरी व नांव
सोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्रांच्या प्रती जोंडलेल्या आहेत.
1) दहावी ,बारावी, पदवी,MSCIT,संगणक पदवी,अनुभव इ.गुणपत्रक व प्रमाणपत्राच्या छायांकीत व स्वाक्षांकीत केलेल्या
प्रति
2) उमेद्वार मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र/जात वैद्यता प्रमाणपत्र आवश्यक.