‘ स्वच्छता श्रमदानातून  गांधीजींना अभिवादन ‘2 ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त  कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम

आज रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी करण्यात आली.  उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान करून गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन केले.दि. 15 सप्टेंबर, ते 2 ऑक्टोबर, 2018 या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये ‘þ֓”ûŸÖÖ हि सेवा ‘ अभियान राबविले जात आहे. याप्रमाणे आज  कोल्हापूर जिल्हा परिषद, कार्यालय परिसर स्वच्छता मोहिम राबविणेत आली.सर्व प्रथम गांधींजी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतिमा पूजन मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी आधिकारी, जि.प.कोल्हापूर व मा.श्री. आर. पी.शिवदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मा.श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मा.श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पा. व स्व.), मा.श्री. रविकांत अडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.वि.), मा.श्री. राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं), मा.श्री. तुषार बूरूड, कार्यकारी अभियंता (बांधकाम), मा.श्री. बसरगेकर, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.वि), मा.श्री. राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आदी. उपस्थित होते.

यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सर्व कर्मचा-यांशी खुला संवाद साधला. यावेळी उपस्थित कर्मचा-यांना जिल्हा परिषदेची कामगिरी आणखी चांगली होण्यासाठी तसेच कर्मचा-यांना प्रोत्साहीत करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम आणि कल्पना मांडण्यास सांगितले. यातून विविध कल्पना कर्मचा-यांनी मांडल्या.

पाणी व स्वच्छता विभागामार्फत आयोजित या मोहिमेमध्ये श्रमदानासाठी सर्व खातेप्रमुख आपल्या विभागातील कर्मचा-यांसह उपस्थित होते. आज सकाळी ठिक 10.00 वाजता या स्वच्छता श्रमदानास सुरूवात झाली. श्रमदानानंतर ‘ŸÖÓ²Ö֏Öæ मुक्त कोल्हापूर जिल्हा परिषद व ¯Ö׸üÃÖ¸ü’ ही घोषणा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांनी केली. व त्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक कार्यवाही करणेस सूचना दिल्या.

स्वच्छता श्रमदानासाठी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी स्वच्छता साहित्याचा पुरवठा केला. या स्वच्छता श्रमदानातून  2 डंपर कचरा संकलित करण्यात आलेला आहे. तर या स्वच्छता श्रमदानासाठी सर्व विभागांचे 160 कर्मचारी उपस्थित होते.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

Leave a Comment