आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2017-18 – दुसरी फेरी

 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेची पहिली फेरी पार पडलेली आहे. मात्र पहिल्या फेरीअंती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांमधील RTE अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाच्या 25 % जागा शिल्लक राहत असलेने दि. 30/04/2017 ते दि. 10/05/2017 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेची दुसरी फेरी राबविणेत येणार आहे. तरी सदर कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक पालकांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करावेत.

आरटीई अंतर्गत 25 % आरक्षण मधून प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 

अ.क्र.कागदपत्राचा प्रकारवैध कागदपत्रांची सूची
1जन्माचे प्रमाणपत्रग्रामपंचायत/ न.प./ म.न.पा. यांचा दाखला/ रूग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी/ बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला/ आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन
2वास्तव्याचा पुरावाआधार कार्ड / पासपोर्ट / निवडणूक ओळखपत्र / वीज बिल / टेलिफोन बिल / घरपट्टी / वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक. भाडे तत्त्वावर राहणा-या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाकडील नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक.
3सामाजिक वंचित घटक (SC व ST) यांचेसाठी पालकांचे जातीचे प्रमाणपत्रतहसिलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.)
4आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (रू. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा)तहसिलदार / नायब तहसिलदार दर्जापेक्षा कमी नसलेल्या महसुल अधिका-यांचे प्रमाणपत्र आर्थिक वर्ष 2015-16 (मार्च 2016 अखेरचे     रू. 1 लाखापेक्षा कमी असलेले)
5दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्व प्रमाणपत्रजिल्हा शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे 40 % पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र
6बालकाचे छायाचित्रअर्ज करणा-या बालकाचे अलिकडीच्या काळातील पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र

 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मदत केंद्रे स्थापन करणेत आलेली आहेत. तरी ऑनलाईन अर्ज करतेवेळी पालकांना कोणतीही समस्या आल्यास खालील मदत केंद्रांशी संपर्क साधावा किंवा मदत केंद्रावरून ऑनलाईन अर्ज करावेत. त्याचप्रमाणे पालक महा-ई सेवा केंद्रातून तसेच ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम कक्षातून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

अ.
क्र.
तालुकामदत केंद्राचे नाव पत्तासंपर्काकरीता व्यक्तीचे नाव हुद्दादूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकई-मेल आयडी
1आजरापार्वती शंकर शाळा – मु.पो. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूरश्री. चव्हाण, शाळा कर्मचारी7709720368brcajara@yahoo.in
2भुदरगडबी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूरश्री. नीरज ढेरे, डाटा एन्ट्री ऑपरेटर9970151830neerajdhere09@rediffmail.com
3चंदगडबी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, चंदगड, जि. कोल्हापूरश्री. प्रसाद पाटील, कनिष्ठ सहाय्यक8308485960ssachandgad12@gmail.com
4गडहिंग्लजनेट पॉईंट – बसवेश्वर काँम्प्लेक्स, संकेश्वर रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूरश्री. तौफीक जी. नदाफ, संस्था चालक9075857569, 9923062257netpoint666@gmail.com
5गडहिंग्लजप्रोग्रेसिव्ह स्कूल – आजरा रोड, नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूरश्री. यशवंत एस. सुरंगे, मुख्याध्यापक9226470233, 9404978567yashwant.surange@gmail.com
6गगनबावडादत्ताजीराव मोहिते-पाटील हायस्कूल – मु.पो. तिसंगी, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूरश्री. पी. के. गुरव, हायस्कूल कर्मचारी9404480797beogaganbawada@gmail.com
7हातकणंगलेबी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती,हातकणंगले, जि. कोल्हापूरश्री. विष्णू गोंधळी, डाटा एन्ट्री ऑपरेटर9767972338, 9175503066beohatkanangale@rediffmail.com
8हातकणंगलेशिक्षण मंडळ, नगरपालिका, इचलकरंजी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूरश्री. काळगे, प्रशासन अधिकारी9860263773npaoichlkaranji@gmail.com
9कागलबी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, कागल,

जि. कोल्हापूर

श्री. डॅनी डिसोझा, डाटा एन्ट्री ऑपरेटर9765899298deossakagal@gmail.com
10करवीरआंबुबाई पाटील स्कूल – मु.पो. गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूरश्री. के. डी. पाटील, मुख्याध्यापक9326617509karveerbeo@gmail.com
11करवीरपॅरामाऊंट स्कूल – मु.पो. कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूरश्री. देसाई, शाळा कर्मचारी9420583690karveerbeo@gmail.com
12करवीरसर्वानंद स्कूल – मु.पो. गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूरश्री. स्वामी, शाळा कर्मचारी9420583690karveerbeo@gmail.com
13करवीरदूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल – मु.पो. इस्पुर्ली, ता. करवीर,जि. कोल्हापूरसौ. राऊत, शाळा कर्मचारी9372476529karveerbeo@gmail.com
14पन्हाळाबी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, पन्हाळा, जि. कोल्हापूरश्री. राहुल रेडेकर, डाटा एन्ट्री ऑपरेटर9922355959brcpanhala@yahoo.in
15पन्हाळाप्रोसॉफ्ट काँप्युटर – कॉलेज रोड, वारणानगर, ता. पन्हाळा,जि. कोल्हापूरश्री. श्रीकांत जाधव, केंद्रप्रमुख9421174864brcpanhala@yahoo.in
16पन्हाळाफिनीक्स – मु.पो. कळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूरश्री. भगवान चौगुले, केंद्रप्रमुख9970047900brcpanhala@yahoo.in
17राधानगरीशाहू इंग्लिश स्कूल – मु.पो. राधानगरी, जि. कोल्हापूरश्री. मांगोरे, शाळा कर्मचारी9096918894beoradhanagari@gmail.com
18शाहूवाडीबी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, शाहूवाडी, जि. कोल्हापूरश्रीम. सारिका सुर्यवंशी, डाटा एन्ट्री ऑपरेटर9405160976shahuwadi.education@gmail.com
19शिरोळबी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, शिरोळ, जि. कोल्हापूरश्रीम. संगीता कांबळे, डाटा एन्ट्री ऑपरेटर9623637557beoshirol@gmail.com
20शिरोळझेले हायस्कूल – जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूरश्री. कदम सर, शिक्षक02322-225263, 9623637557beoshirol@gmail.com
21शिरोळगुरूकुल स्कूल – मु.पो. अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूरश्री. गणेश नायकुडे, शाळा कर्मचारी9923226666beoshirol@gmail.com
22म.न.पा. कोल्हापूरभारती स्कूल – कदमवाडी, कोल्हापूरश्रीम. आस्मा गोलंदाज, सी.आर.सी. प्रमुख7840990380schoolboardkmc@gmail.com, nachiketsarnaik@rediffmail.com
23म.न.पा. कोल्हापूरप्राथमिक शिक्षण मंडळ (महानगरपालिका), शिवाजी मार्केट बिल्डींग, शिवाजी चौक, कोल्हापूरश्री. नचिकेत सरनाईक, MIS को-ऑर्डीनेटर0231-2543283, 8149279797nachiketsarnaik@rediffmail.com, schoolboardkmc@gmail.com
24म.न.पा. कोल्हापूरओरीएंटल स्कूल – टाकाळा, राजारामपुरी, कोल्हापूरश्री. एच. आर. पाटील, सी.आर.सी. प्रमुख9822418971schoolboardkmc@gmail.com, nachiketsarnaik@rediffmail.com
25म.न.पा. कोल्हापूरपी. शिवाजी स्कूल – शिवाजी पेठ, कोल्हापूरश्री. सातपुते, सी.आर.सी. प्रमुख9921810836schoolboardkmc@gmail.com, nachiketsarnaik@rediffmail.com
26म.न.पा. कोल्हापूरपोदार स्कूल – साने गुरूजी वसाहत नजीक, कोल्हापूरश्री. एस. कोकीतकर, सी.आर.सी. प्रमुख9226258282schoolboardkmc@gmail.com, nachiketsarnaik@rediffmail.com

 

 

 

(श्री. एस. आर. चौगुले)

                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                        जिल्हा परिषद कोल्हापूर

 

 

 

 

 

Leave a Comment