नाविन्यपूर्ण योजना

voice sms योजना

योजनेचे स्वरुप :- या योजनेअंतर्गत ग्रामिण कार्यक्षेत्रातील लाभार्थीना खालील प्रमाणे आर्थीक मदत मिळते.
अ) र्‍हदय शस्त्रक्रिया करिता :- र.रु.१०,०००/-
ब) कॅन्सर उपचार करिता :- र.रु.७,०००/-
क) किडणी रोपन करिता :- र.रु.१०,०००/-
सदर योजनेचा लाभ देण्याकरिता जि. प. स्तरावर खालील प्रमाणे र्‍हदयरोग, कॅन्सर, किडणी करिता आर्थिक मदत समिती,जि.प.कोल्हापूर ही समिती गठीत केलेली आहे.

 

  • मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर – अध्यक्ष
  • मा.सभापती, बांधकाम व आरोग्य समिती जि.प. कोल्हापूर – सदस्य
  • मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर. – सदस्य
  • मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. कोल्हापूर. – सदस्य
  • मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कोल्हापूर – सदस्य सचिव

लाभार्थी कोण :- र्‍हदयरोग,कॅन्सर किंवा किडणी या रोगांनी पिडीत असलेली व्यक्ति.
निकष व अटी :-

  • रुग्ण कोल्हापूर जिल्हयातील ग्रामिण कार्यक्षेत्रातील असावा.
  • रुग्णांने शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयात उपचार /शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल.
  • ज्यांना वैद्यकिय परिपूर्ती मिळते अश्या कर्मचारी रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
  • अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :- मा.अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांचे नांवे लाभार्थीचा अर्ज
  • शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयाचे
  • रोगनिदानासह, खर्चाचे अंदाजपत्रक.
  • रहिवाशी दाखला. (तलाठी यांचेकडील)
  • रेशनकार्ड पहिल्या व शेवटच्या पानांची प्रमाणित केलेली छायांकित प्रत.

संबंधीत संपर्क अधिकारी :-
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,कोल्हापूर.
दूरध्वनी क्रमांक – २६५२३२७, २६६१६५३.
प्रत्येक वर्षी लाभ घेऊ शकणार्‍या लाभार्थीची संख्या :-
सरासरी १०० (पात्र सर्व लाभार्थीना लाभ दिला जातो.)

टिप ः- जी. बी. सिन्ड्रोम रुग्णासाठी रु.७,०००/- मदतीचा ठराव जि. प. सवॅसाधारण सभा क्र. ९३ ने दि. २४/०७/२०१२ रोजी मंजुर करणेत आलेला आहे. मजुरीसाठी शासनास पत्र क्र. २०९ दि. १७/०९/२०१२ ने सादर केलेला आहे.
योजनेवर मंजूर होत असलेले अनुदान :- जिल्हा परिषद,कोल्हापूर स्वीय निधितून तरतूद केली जाते.

सावित्रीबाई्र कन्या कल्याण पारितोषिक योजना (दारिद्रय रेषे खालील जोडप्यांसाठी)

शासन निर्णय क्र. साफुयो/२००४/१५११/प्रक्र २९७/कुक३ दिनांक २४/४/२००७ नविन योजनेनुसार (दि.१ एप्रिल २००७ पासून) एक मुलीवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणार्‍या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व मुलींचे नावे रु.आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत व दोन मुलींनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणार्‍या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व प्रत्येक मुलीच्या नावे रु.चार हजार या प्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत देण्यांत येते.या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

  • या योजनेचा लाभ देणेकरिता कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणारी व्यक्ती ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबांतील असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यांतील आधिवासी असणार्‍या कुटूंबानाच देय आहे.
  • सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीने (पती अथवा पत्नी)शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक यांचे रुग्णालयांत केलेली असावी.
  • सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीस (पती अथवा पत्नी) एक किंवा दोन मुलीच असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा.

मा

Leave a Comment