अनधिकृत चालू असलेल्या प्राथमिक शाळाबाबत

 

कोल्हापूर जिल्हयामध्ये  शासनाच्या कोणत्याही  परवानगी शिवाय  अनधिकृत चालू असलेल्या 24 प्राथमिक  शाळा आहेत. पालकांनी सदर  शाळामध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये. यासाठी सदर अनधिकृतपणे सुरु असणाऱ्या शाळांची यादी दि.05/05/2017 रोजी दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेत आलेली आहे.  कोल्हापूर जिल्हयातील खाजगी शिक्षण संस्थेमधील अनधिकृत सुरु असणारे वर्ग तात्काळ बंद करणेबाबत या कार्यालयाकडून दि.04/05/2017 रोजी 24 शाळांच्या अध्यक्ष/ मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस लागू करणेत आलेल्या आहेत. तथापि सदरच्या शाळा अद्यापही सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009 मधील कलम 18(5) नुसार सदर शाळांना शाळा बंद करणेबाबत  व द्रव्य दंड भरणेबाबत नोटीस लागू केलेल्या आहेत. तथापि अद्यापही सदर शाळांनी दंड भरणा केलेचे दिसून येत नाही व सदरचे अनधिकृत वर्गही सुरु आहेत.  याबाबत पुढील कारवाई  होणेबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविणेत आलेले आहे.

 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद, कोल्हापूर

Leave a Comment