जिंकलो तर आनंद मिळतोच, पण अशी लढाई असावी की, चुकुन हारलोच तरी सुध्दा आनंदच मिळेल असे स्फुर्तीदायक उदगार जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी आयोजित क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक समारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका अमल महाडिक यांनी पोलिस क्रीडांगण, कोल्हापूर या ठिकाणी काढले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पर्धा अत्यंत उत्सहात पार पाडताना सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य झालेचे विषद केले. सर्व पदाधिकारी आणि जि.प. सदस्य यांच्या सहकार्यामुळे अनेक उपक्रम हाती घेवून यशस्वी करणे शक्य होत असलेचे मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष मा. सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती मा. अंबरिषदादा घाटगे, मुख्य लेखा व वित्त् अधिकारी श्री. संजय राजमाने, गट विकास अधिकारी पन्हाळा श्रीमती पी.सी. मोरे यांची समयोचित भाषणे झाली. राजर्षि शाहू क्रिडा प्रशालेच्या सर्व प्रशिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे जल्लोषात आभार मानले गेले. कलामंचच्या कर्मचाऱ्यांने क्रिडा गीत गावून सर्वांचे मनोरंजन केले.
प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण केले गेले. राधानगरी तालुक्याने या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तर व्दितीय क्रमांक पं.स. पन्हाळा व तृतीय क्रमांक पं.स. कागलने पटकाविला. क्रिडा ध्वज उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र भालेराव यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपुर्त करण्यात आला. सुत्रसंचलन प्राध्यापक श्री. संजय लोंढे, सौ. कुंभार व श्री. माळवी यांनी केले. पारितोषिक वितरणांनंतर कर्मचारी खेळाडूंनी मैदानावर प्रचंड जल्लोष केला. कार्यक्रमाचे आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार यांनी मांडले.
यावेळी मा. भगवान पाटील, मा. महेश चौगुले जि.प. सदस्य व पं.स. पन्हाळा, भुदरगड सभापती, मा. श्री. राहुल कदम, उपमुख्य लेखा व वित्त् अधिकारी, मा. श्री. राजेंद्र नागणे, मा. श्री. बर्गे, मा. श्री. सोमनाथ् रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, कृषि अधिकारी, डॉ. प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता श्री. एस.एस. शिंदे, सर्व संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व क्रिडा स्पर्धेचे नियोजन सामान्य प्रशासन विभागाने उत्कृष्टरित्या केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर