जिल्हा नियोजन समिती अनुदानातून मा. श्री. चंद्रकांत पाटील, पालक मंत्री , मा. सौ. शौमिका महाडिक, अध्यक्षा यांच्या संकल्पनेतून व मा. डॉ कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात येणारी नाविन्यपूर्ण योजना कॅन्सर रुग्ण तपासणी व कॅन्सर रुग्ण शोध मोहिम करवीर तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आशा स्वयंसेविकेना कॅन्सर बाबतचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सर्व प्रा.आ.केद्रांच्या कार्यक्षेत्रातील गांवामध्ये आशा मार्फत सव्हेक्षण करण्यात आले होते. आशा स्वयंसेविकांच्या सर्व्हेक्षणामधून निघालेल्या रुग्णांची तपासणी प्राथमिक आरेाग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी यांनी केली असून त्यांच्या तपासणी मध्ये निघालेल्या संशयित रुग्णांची तपासणी कोल्हापूर कॅन्सर हॉस्पीटल मार्फत करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत करवीर तालुक्यात एकुण चार शिबीरे घेण्यात आलेली आहे. मुडशिंगी व इस्पुर्ली येथे लवकरत कॅन्सररुग्ण तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे.
कॅन्सर रुग्ण तपासणी शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र मा. शिरोली येथे दिनांक 13 मार्च 2018 रोजी घेण्यात आले या शिबीरराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांच्याहस्ते करण्यात आला. या प्रसंगी आरोग्य समिती सदस्या मा. सौ. शिल्पा चेतन पाटील , पं.स. करवीरचे उपसभापती मा. श्री.विजय भोसले, पं.स. सदस्य मा. राजे्ंद्र सुर्यवंशी, सौ. अश्विनी धोत्रे, सौ. सविता पाटील, ग.वि.अ. श्री. सचिन घाटगे, शिरोलीेचे सरपंच सौ.रेखा कांबळे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना मा. सुभाष सातपुते म्हणाले की, मुख कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर , स्तन कॅन्सर इ. प्रमाण वाढले असून कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी या नाविन्यपूर्ण योजनेचा नक्कीच उपयोग होणार आहे. आरोग्य समिती सदस्या मा. सौ. शिल्पा पाटील म्हणाल्या की, लोकांनी व्यसनापासून दूर राहणे, नियमित व्यायाम, संतुलीत आहार, तणावापासून दूर अशा प्रकारची जीवनशैली स्वीकारावी असे नमुद करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविकात बोलतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ नलवडे म्हणाले की, मा. कुणाल खेमनार, मु.का.अ व डॉ. उषादेवी कुंभार, जि.आ.अ. यांच्या मागदर्शनाखाली कृती आराखडा तयार करण्यात आला असून योजना व्यस्थितपणे तालुक्यात राबविण्यात येत आहे मा. शिरोलीतील शिबीरामध्ये 106 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 19 इतक्या रुग्णंाना पुढील प्ुढील तपासणी साठी संदर्भित करण्यात आले आहे. उपस्थितांचे स्वागत डॉ. बामणीकर यांनी केले तर आभार डॉ. भोई यांनी मानले.