कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जि. प च्या शाळांमध्ये राबविणेत आलेल्या “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सर्वेक्षणानुसार आढळलेल्या दाखलपात्र (6+) वयोगटातील जवळपास 67 टक्के बालकांची पटनोंदणी गुढी पाडव्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा नजीकच्या कालावधीत विद्यार्थी संख्येने समृध्द होण्याची आशा आहे.
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत पटनोंदणीचे सर्वेक्षण करणेत आले. या सर्वेक्षणामध्ये 6+ वयोगटातील दाखलपात्र मुले एकूण 28203 बालके आढळून आली. त्यापैकी गुढी पाडव्या दिवशीच एकूण 18843 बालके जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झालेली आहेत.त्याची टक्केवारी 67 % इतकी आहे. तसेच दाखलपात्र वयोगटातील उर्वरित बालके शैक्षणिक सत्र सुरु होईपर्यंत जि. प च्या शाळांमध्येच दाखल होणे अपेक्षित आहे. “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” कार्यक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये यशस्वी होणेकामी पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील चार वर्षांपासून “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” हा अभिनव उपक्रम राबविणेत येतो. गतवर्षीपेक्षाही या उपक्रमास यावर्षी चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. यावर्षी जिल्हा परिषद शाळांमार्फत दाखलपात्र बालकांच्या गृहभेटी, शाळांची रंगीत जाहिरात पत्रके अशा पद्धतीने व्यापक जनजागृती करणेत आली. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल होणाऱ्या बालकांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश,डिजीटल शाळा, शालेय पोषण आहार तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे असे आवाहन करणेत येत आहे.
अ. क्र. | गटाचे नाव | 6+ वयोगटातील दाखलपात्र संख्या | गुढीपाडव्यादिवशी दाखल विद्यार्थी संख्या | दाखल टक्केवारी
|
1 | आजरा | 965 | 607 | 62.90 |
2 | भुदरगड | 1473 | 1200 | 81.47 |
3 | चंदगड | 1989 | 1492 | 75.01 |
4 | गडहिंग्लज | 1713 | 1044 | 60.95 |
5 | गगनबावडा | 520 | 477 | 91.73 |
6 | हातकणंगले | 4015 | 2024 | 50.41 |
7 | कागल | 2535 | 1657 | 65.36 |
8 | करवीर | 4978 | 2873 | 57.71 |
9 | पन्हाळा | 2783 | 2123 | 76.28 |
10 | राधानगरी | 2528 | 1706 | 67.48 |
11 | शाहुवाडी | 1954 | 1701 | 87.05 |
12 | शिरोळ | 2750 | 1939 | 70.51 |
एकूण | 28203 | 18843 | 67.00 |
शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जिल्हा परिषद कोल्हापूर