आज दिनांक 7 जून 2018 हालोंडी ता. हांतकणगले येथे बोगस डॉक्टर श्री. भरत जिनगोंडा पाटील वय 45 वर्षे यांचे वर महाराष्ट्र वैदयकिय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 32 (2) व 33-अ या कलमाखाली पुलाची शिरोली येथील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह यात बोगस डॉक्टरांनी तात्काळ अवैद्यरित्या खाजगी वैद्यकिय व्यवसाय बंद करावा अन्यथा गंभीर दखल घेवून गुन्हे दाखल करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार यांनी नमुद केले.
तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समिती हांतकणगले कडे बोगस डॉक्टर श्री भरत जिनगोंडा पाटील ही व्यक्त्ति हालोंडी या ठिकाणी अवैद्यरित्या कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना जनतेमध्ये हमखास मुलगा होण्याची खात्री देवून औषधे देत होता. तसेच अपत्यहीन जोडप्यांना अपत्य होण्यासाठी औषध उपचार करीत असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती ने केली होती . सदर तक्रारीचे गंभीर दखल घेवून बोगस डॉक्टर वर त्वरीत कारवाई करणेच्या सूचना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार यांनी सूचना दिल्या. त्यानुसार डॉ उषादेवी कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली तालुकास्तरी बोगस डॉक्टर शोध समिती हांतकणंगले व पोलीस स्टेशन पु. शिरोली मार्फत डमी रुण्ग पाठवून सापळा रचून रंगेहांत पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टर कडे बोगस नॅचरोपॅथीचे प्रमाणपत्र तसेच कामोउत्तेजक, शक्तीवर्धक आयुवेर्दिक औषधांचा अवैद्यरित्या मोठा साठा सापडला, त्याचप्रमाणे कामोउत्तेजक पोस्टर्सही सापडले, मुलागाच होणार अन्यथा पैसे परत अशा अशयाचा डिजीटल बोर्ड जोगोजागी लावण्यात आले होते.
सदर कारवाई मध्ये डॉ सुहास कोरे, तालुका आरोग्य अधिकारी, पं.स. हांतकणगंले, श्री परशुराम कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षण, डॉ सोनवणे डी.एस. जिल्हा आयुष अधिकारी, डॉ जेसिका ॲन्ड्रयुज वै.अ. पु. शिरोली, संगीता जगताप, महिला पोलिस , तसेच अंधश्रध्दा निर्मुलन समिती, डॉ उषादेवी कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. देसाई एफ.ए. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सहभागी होते.