“गुरुवार  डास सहांरक दिन  ”  जिल्हा परिषद मुख्य इमारती मध्ये साजरा करणेत आला.

डंख छोटा धोका मोठा (Small Bite Big Threat)

 

    गुरुवार  डास सहांरक दिन   जिल्हा परिषद मुख्य इमारती मध्ये साजरा करणेत आला.

आज दिनांक 28/06/2018 रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य इमारती मध्ये    गुरुवार  डास सहांरक दिन    साजरा करणेत आला त्याकरिता मा.डॉ.कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारी, इजि.बुरुड कार्यकारी अभियंता बांधकाम, डॉ.सुहास कोरे अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.फारुख देसाई जिल्हा आर.सी.एच. अधिकारी, श्री.एम.एम.पाटील विस्तार अधिकारी आरोग्य तसेच आरोग्य विभागा कडील सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य इमारतीचा परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली सर्व पाणी साठयाचे सर्व्हेक्षण करण्यात आले, पाणी साठयामध्ये गप्पी फिश टाकणेची कार्यवाही करणेत आली, खडडे असणा-या जागी खडडे मुझवणे कार्यवाही करणेत आली, साचलेल्या पाण्यामध्ये व उघडया टाक्यामध्ये टेमिफॉस टाकणेत आले, मुख्य इमारतीच्या सर्व खोल्यामध्ये धुरफवारणी करणेत आली, उघडयावरील टायरी नष्ट करण्यात आली, अडगळीचा कचरा साफ करण्याची कार्यवाही करणेत आली. जिल्हा परिषद मध्ये सर्व परिसरा मध्ये डास सहांरक मोहिम राबविण्यात आली असुन जिल्हयातील सर्व गांवामध्ये गुरुवार हा डास सहांरक दिनसाजरा करणे बाबत सुचना देणेत आलेल्या आहेत तसेच जिल्हयामध्ये तालुकास्तरीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे.

उद्यापासुन तालुकास्तरावरील कार्यशाळा

अ.क्रं.तालुकाकार्यशाळा दिनांकवेळअ.क्रं.तालुकाकार्यशाळा दिनांकवेळ
42
1करवीर05/07/2018सकाळी 107राधानगरी02/07/2018सकाळी 10
2पन्हाळा05/07/2018दुपारी 1.308भुदरगड02/07/2018दुपारी 1.30
3शाहुवाडी05/07/2018सांय 4.009गगन बावडा02/07/2018सांय 4.00
13
4शिरोळ29/06/2018सकाळी 1010गडहिग्लज03/07/2018सकाळी 10
5हातकणंगले29/06/2018दुपारी 1.3011आजरा 03/07/2018दुपारी 1.30
6कागल29/06/2018सांय 4.0012चंदगड03/07/2018सांय 4.00


Leave a Comment