26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 26/11/2018 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता साजरा करणेत आला. त्या प्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे अध्यक्षतेस्थानी होते. यावेळी मा. शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री अंबरिषसिंह घाटगे, मा. प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) रविकांत आडसुळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राजेंद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) आशा उबाळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय शिंदे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
श्री. बी.पी.माळवे सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन व भारतीय संविधाना विषयी माहिती दिली. या प्रसंगी उद्रदेश पत्रिकेचे सामुहिक वाचन करणेत आले. तसेच 26/11 च्या मुंबईवरील अतिरेकी हल्यात शहिद झालेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहणेत आली. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सही/-
(रविकांत आडसुळ)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर