दि.१ डिसेंबर 2018 रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी व जलव्यवस्थापन समितीमार्फत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत वेंगुर्ला, जि. सिंधुदूर्ग येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अभ्यास दौऱ्यांतर्गत भेट दिली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे घनकचऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी हा अभ्यास दौरा मार्गदर्शक ठरणार आहे
नगरपरिषद वेंगुर्ला, जि. सिंधूदुर्ग येथील आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा अभ्यासदौरा करणेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर कडील स्थायी समिती व जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य यांनी दिनांक ०१. १२ . २०१८ रोजी भेट देऊन पाहणी केली. सदर अभ्यासदौऱ्यावेळी ओल्या कचऱ्या पासून बायोगॅस युनिट, प्लास्टिक क्रशर मशीन , पाल्यापाचोळ्यापासून ब्रिकेटस निर्मिती मशीन इत्यादींची पाहणी करून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सदरचा प्रकल्प उभारणे करिता अभ्यासदौरा करणेत आला.
या अभ्यासदौऱ्यातील समिती सदस्यांना नगरपरिषद वेंगुर्ल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव साबळे यांनी माहिती दिली. सदर अभ्यासदौरा समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मा. शौमिका महाडिक,उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील पेरीडकर शिक्षण सभापती मा. अंबरीशसिहं घाटगे, समाजकल्याण सभापती मा. विशांत महापुरे, जेष्ठ सदस्य मा. श्री. अरुण इंगवले, मा. शिवाजीराव मोरे, श्री. राजेश पाटील, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, व लेखाधिकारी श्री. संजय कुंभार इ. उपस्थित होते.