गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर

गोवर रुबेला लसीकरण मोहिम कोल्हापूर जिल्हयामध्ये 27 नोव्हेंबर 18 पासून मोठया उत्साहत सुरुवात झाली आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधिनी  सहभागी झाले असून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आशा विविध ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित होते.  या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वयोगटातील एकुण  767340  इतके लाभार्थी निश्चित झाले असून मोहिम सुरु झालेपासून केवळ 09 दिवसामध्ये  378437 इतक्या मुला-मुलीना लसीकरण करण्यात आले असून हे काम एकुण उदिदष्टाच्या 49 टक्के  झाले आहे. लस दिलेल्या  378437 लाभार्थ्या पैकी केवळ 03 मुलांना लसीकरणा नंतर किरकोळ स्वरुपाच्या गुंतागुंत आढळली आहे. गुंतागुंतीचे प्रमाण हे 0.0007 टक्के इतके अत्यल्प आहे.

गुंतागुंतीचे प्रमाण अत्यल्प असले तरी गुंतागुंत झालेल्या लाभार्थीला तत्काळ उपचार, संदर्भ सेवा तज्ञ मार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नागरिकांनी  न घाबरता आपल्या मुला-मुलीनां  लसीकरण करुन घ्यावे व आपल्या  पाल्यांना गोवर, रुबेला सारख्या जीव घेण्या आजारापासून संरक्षीत करावे. गोवर रुबेलाची लस अत्यंत सुरक्षीत व  परिणामकारक आहे. ही लस महाराष्ट्रमध्ये  पुणे येथे उत्पादित होत असून जगभरातील 70 देश हया लसीचा वापर करीत आहेत.  राज्यात पहिल्यांदाच मोठया प्रमाणात इंनजेक्टेबल मोहिम होत आहे. लसीकरण प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळा, अंगणवाडी व आरोग्य संस्था आशा विविध ठिकाणी  8500 सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सत्राच्या ठिकाणी सर्व साधन सामुग्रीनी सुसज्ज, प्रशिक्षीत लसीकरण पथक, अत्यावश्यक औषधसाठासह  तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपलब्ध ठेवण्यात आला आहे. प्रत्येक बालकांच्या सुरक्षतेसाठी  नवीन सुई (auto disposable synringe) चा वापर करण्यात येत आहे. लसीकरणानंतर मुलांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येत असून कोणत्याही प्रकारची गुंतागुंत होणार नाही यांची दक्षता घेण्यात येत आहे. गोवर रुबेला आजाराचे उच्चाटन होणेसाठी  सर्व पालकांनी 100 टक्के सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी व एक सशक्त भारत देश घडवण्याचे योगदान दयावे.

या मोहिमेध्ये सर्व लोकप्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय संघटना आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग , जिल्हा माहिती कार्यालय, प्रिन्ट मेडिया, इलेक्टॉनीक मेडिया  यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.   यापुढे मोहिम पूर्ण होई पर्यत असेच सहकार्य मिळावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहवान करण्यात येत आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी

 जिल्हा परिषद कोल्हापूर

Leave a Comment