कृषी विभाग

कृषि विभागाकडे प्रामुख्याने शेतक-यांना आवश्यक असणा-या निविष्ठा पुरवठयाचे काम आहे.त्या मध्ये खते ,बियाणे,किटकनाशके,औजारे यांचा समावेश आहे.जिल्हयामध्ये आवश्यक असणारा खताचा साठा गरजेइतके बियाणे व किटकनाशके ही निरनिराळया विक्री केंद्गावर उपलद्व करुन ठेवणे, त्यावर नियंत्रण ठेवणे हे या विभागामार्फत पाहीले जाते सदर कामाचे सयनियंत्रण पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागामार्फत करणेत येते.

या विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी कृषी विकास अधिकारी( वर्ग-१),जिल्हा कृषी अधिकारी (वर्ग-२),मोहीम अधिकारी (वर्ग-२),जिल्हा कृषी अधिकारी वि.घ.यो.(वर्ग-२) प्रत्येकी एक पद कृषी अधिकारी वर्ग-३-२ पदे, या शिवाय पंचायत समिती स्तरावर कृषी अधिकारी वर्ग-३-२१ पदे,तर विस्तार अधिकारी कृषी ३२ पदे मूंजर आहेत.

जिल्हाची थेडक्यात माहीती खालील प्रमाणे आहे.

बाब/तपशिलसन २०१५-१६ (क्षेत्र हेक्टर)
भौगोलिक क्षेत्र हेक्टर७,७६,३००
जंगल क्षेत्र१,४०,०००
बिगर शेती उपयोगीताकरीता आणलेले क्षेत्र३६,२००
ओसाड व मशागतीस अयोग्य क्षेत्र४४,२००
कायम स्वरुपी चराऊ कुरने४१,१००
लागवडीलायक क्षेत्र हेक्टर४,७६,६००
खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ऊसासह हेक्टर३,९३,८६९
रब्बी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर४१,१००
उन्हाळी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर५०५०
ऊसाचे सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर९९,६००
जिल्हा सरासरी पाऊस मि.मि.१८९९ मि.मि.

Leave a Comment