जिल्हा परिषद कोल्हापूर येथे छत्रपती राजर्षी शाहू सभागृहामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर जिल्हा परिषद  मध्ये छत्रपती राजर्षी  शाहू  सभागृहामध्ये डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात  १२६ वी  जयंती दि १४/०४/२०१७ इ. रोजी सकाळी संपन्न करण्यात आली. डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शोमिका महाडिक जिल्हा परिषद  यांचे हस्ते करण्यात  आली .

त्याप्रसंगी मा . समाज कल्याण सभापती श्री . विशांत महापुरे , मा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ . शुभांगी शिंदे, मा मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, अति . मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . इंद्रजित देशमुख, प्रमुख वक्ते प्रा . विजय काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी  एम . एस  घुले, श्री सुशील संसारे, समाज कल्याण अधिकारी श्री प्रदीप भोगले व सर्व खाते प्रमुख तसेच कास्ट्राईव्ह  संघटना संघटनेचे अध्यक्ष श्री नामदेव कांबळे, श्री सुधाकर कांबळे व इतर पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी संघटनेच्या वतीने व कै. आरती पाटील (सावकार)  हिच्या स्मरणार्थ श्री धनंजय जाधव यांच्या वतीने डॉ ए पी जे अब्दुल कलाम वाचनालयास रक्कम रुपये १०००० किमतीचे पुस्तके प्रदान करण्यात आली

या प्रसंगी प्रा विजय काळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रणाली तसेच आरक्षनाव्यतिरिक्त  न समजलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आजच्या काळातील  जगताना कसे  महत्वाचे आहे हे सांगितले. तसेच प्रत्येक गावातील समाज मंदिराचे सार्वजनिक वाचनालय रूपांतर होणे गरजेचे आहे. यावेळी सौ  शमिका  महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त  केले. जयंती कार्यक्रम प्रास्ताविक यांनी समाज कल्याण अधिकारी श्री प्रदीप भोगले केले तर अति . मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . इंद्रजित देशमुख मनोगत व्यक्त  केले.

जिल्हा परिषद येथे सर्व विभागाचा आढावा

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सर्व जिल्हा परिषदेतील  विभागाच्या  योजना व प्राप्त  निधी , योजनेचे  निकष योजना कोणासाठी योजना कमिटी मध्ये  कोण सदस्य असतात अशा सर्व विभागीय बाबीचा आढावा  मा  अध्यक्षा मा उपाध्यक्ष  व विषय  समितीचे सभापती याना मुख्य कार्यकारी अधिकारी ,मा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खाते प्रमुख आपल्या विभागाचा  आढावा  देत आहेत . दि १२०४¬२०१७ रोजी सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण प्राथमिक , शिक्षण माध्यमिक ,महिला व बाल  कल्याण  या विभागाचा आढावा देण्यात आला . दि १३-०४-२०१७रोजी समाज कल्याण , drda,  ग्रामपंचायत, पशुसंवर्धन या विभागाचा आढावा देणेत आला सदर  आढावा बैठकी मध्ये  मा अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समिती सभापती यांनी वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या जिल्हा परिषद येथे सर्व विभागाचा आढावा  सर्व विभागाची आपल्या योजनांचे  निकषाप्रमाणे पात्र लाभार्थीची निवड करावी व त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या . दि १८/०४/२०१७ रोजी उर्वरित विभागाचा  आढावा घेण्यात येणार आहे

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर. करवीर व गगनबावडा तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

करवीर गगनबावडा तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण

दि. 15 मार्च, 2017 ते 31 मार्च, 2017

दि.8/02/2017 रोजी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, कोल्हापूर या केंद्राच्या कामकाजाबाबत बैठक संपन्न झाली.  सदर बैठकित कोल्हापूर जिल्हयातील  करवीर व गगनबावडा या दोन तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तिंचे सर्वेक्षण ग्रामीण भागात जिल्हा परिषद, कोल्हापूर  यांच्यामार्फत  व महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांचेमार्फत दि. 15 मार्च,2017 ते 31 मार्च, 2017 या कालावधीत करण्याचे ठरविले आहे.

सदर अनुषंगाने करवीर व गगनबावडा या तालुक्यातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम      करणा-या दिव्यांग व्यक्तींच्या संघटना, स्वयंसेवी संस्था व दिव्यांग व्यक्ती यांना असे आवाहन करण्यात येते की, त्यांनी सदर सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण व्हावे यासाठी सर्वेक्षण करणा-या यंत्रणेस आवश्यक ते सहकार्य करावे. सदर सर्वेक्षणातुन मिळणा-या माहीतीचा उपयोग अस्थिव्यंग प्रवर्गातील व्यक्तींच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या योजना राबविण्यासाठी होणार आहे.या सर्वेक्षणापासून अस्थिव्यंग प्रवर्गातील एकही दिव्यांग व्यक्ती सुटणार नाही या दृष्टीने कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

या बाबतीत अधिक माहितीसाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.यंाचेशी संपर्क साधावा.

फोन.न. 0231-2656445

E-mail-swozpkop@gmail.com

DRDA Programe & Education primary Examination

मा. सौ. संयोगीताराजे छत्रपती प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करताना. शेजारी श्री. एस. जी. किणींगे, अग्रणी जिल्हा प्रबंधक, कोल्हापूर, श्री. एच. टी. जगताप, प्रकल्प संचालक, जि.ग्रा,वि.यं., कोल्हापूर आणि श्री. पी. बी. लोहार, संचालक, आरसेटी, कोल्हापूर.

“ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरावी व त्यातून आपली, आपल्या कुटुंबाची उन्नती साधावी. दुग्ध व्यवसाय करण्यात प्रामुख्याने महिलांचा खूप मोठा हात आहे. पण तो पारंपारिक पद्धतीने न करता शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीने केला तर चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. महिलांनी सर्व गोष्टीत पुढाकार घेण्याचे ठरवले तरच महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण ही संकल्पना पूर्णत्वास जाईल. तसेच, व्यवसायासाठी आवश्यक भांडवल योग्य व्यक्तीस योग्य प्रकारे पुरवण्यास बँकासुद्धा तत्पर आहेत ” असे विचार बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री. एस. जी. किणींगे यांनी व्यक्त केले. बँक ऑफ इंडिया द्वारा पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर तर्फे आयोजित दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाच्या सांगता समारोहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जि.ग्रा.वि.यं., कोल्हापूर चे प्रकल्प संचालक श्री. एच. टी. जगताप आपल्या मनोगतात म्हणाले, “आजही दुग्धव्यवसाय हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. पण तो व्यावसायिकदृष्ट्या केला पाहिजे. फक्त चूल आणि मूल यातच अडकून न राहता महिलांनी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांचा, विविध योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उदयोजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठीच महिला बचत गटाची चळवळ जोरात सुरु आहे. मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनले पाहिजे. परिणामी समाजात आपली प्रतिष्ठा व मानसन्मान वाढेल. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराभिमुख करण्यासाठी मा. डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद/ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर आणि बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) यांचे संयुक्त विद्यमाने विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित करत आहे.”

मा. संयोगिताराजे छत्रपती आपल्या मनोगतात म्हणाल्या,” मा. छत्रपती शाहू महाराजांचा वारसा पुढे चालवताना सामन्यातील सामान्य व दुर्गम भागातील लोकांचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मा. संभाजी राजे छत्रपती यांनी शाहुवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अतिशय नियोजन पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येळवण जुगाई गावातील १४ महिलांना त्यांच्या आवडीनुसार दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर संस्थेकडे पाठवले. आज या प्रशिक्षणाच्या समारोपाच्या निमित्ताने महिलांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून असे दिसून येते की या ६ दिवसात आरसेटी कोल्हापूरने एक परिपूर्ण प्रशिक्षण दिले आहे ज्यामुळे या महिला भविष्यात यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे येतील. भविष्यात अशा विविध प्रशिक्षणांचा लाभ येळवण जुगाई गावातील लोकांना व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करून त्यांनी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी)  कोल्हापूर या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर चे संचालक श्री. प्रदीप लोहार, श्री. रणदीप भिलवडीकर, गट समन्वयक आणि आरसेटी चे स्टाफ श्री. बाजीराव पाटील, श्री. मदन पाटील, सौ. कल्पना कुलकर्णी उपस्थित होत्या.

पुणे विभागीय विक्री प्रदर्शन दक्खन जत्रा पुणे – २०१७

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद कोल्हापूर

पुणे विभागीय प्रदर्शन 2017

महिला स्वयंसहाय्यता समुहंानी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे पुणे विभागीय विक्री प्रदर्शन दख्खन जत्रा- पुणे 2017 दि.27 ते 31 मार्च 2017 या कालावधीमध्ये गणेश कला क्रिडामंच,  स्वारगेट, पुणे येथे आयोजित करणेत आले आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होणेच्या उद्देशाने स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची चळवळ हा एक प्रभावी मार्ग ठरला असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तंूना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून विभागीय प्रदर्शन प्रत्येक वर्षी  विभागातील 5 जिल्हयापैकी 1 जिल्हयामध्ये आयोजित करणेत येते त्याचा चंागला उपयोग समुहातील महिलंाना नक्कीच होतेा.

पुणे विभागीय प्रदर्शनसाठी कोल्हापूर जिल्हयातुन 10 महिला स्वयंसहाय्यता समुह पाठविणेत आलेले आहेत. त्यापैकी 3 समुह कोल्हापुरी तंाबडा/पंाढरा रस्सा तसेच कोल्हापूरी शाकाहारी/मंासाहारी जेवण तयार करतात, 1 समुह नाष्टा तयार करणेचे काम करतो. याबरोबर पेढे,बर्फी, व विविध प्रकारच्या चटण्या व गावरान कडधान्य, कोल्हापुरी चटणी मसाला, मातीची भंाडी, बेदाणे, मध, आयुर्वेदिक औषधे (मुठळा), आईल पंप/ पेस्ट कंट्रोल असे उत्पादन असलेले वस्तुचे 6 समुह पाठविणेत आलेले आहेत. /

सदर 10 समुहातील महिलंाना ॲानलाईन विक्रीसाठी मोबाईल ॲप उाऊनलोड करुन त्याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणेत आलेले आहे, याचा उपयोग करुन या समुहातील महिला त्यांच्या मालाची ऑन लाईन विक्रीही करु लागल्या आहेत. तसेच प्रदर्शन ठिकाणी 5 समुह मोबाईल ॲपचा वापर करत आहेत.

गुढी पाडवा पट नोंदणी २०१७

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जि. प च्या शाळांमध्ये राबविणेत आलेल्या “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सर्वेक्षणानुसार आढळलेल्या दाखलपात्र (6+) वयोगटातील जवळपास 68 टक्के बालकांची पटनोंदणी गुढी पाडव्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा नजीकच्या कालावधीत विद्यार्थी संख्येने समृध्द होण्याची आशा निर्माण झाली आहे.

सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांमार्फत पटनोंदणीचे सर्वेक्षण करणेत आले. या सर्वेक्षणामध्ये 6+ वयोगटातील दाखलपात्र मुले 15151 मुली 13179 अशी एकूण 28330 बालके आढळून आली. त्यापैकी गुढी पाडव्या दिवशीच 9968 मुले 9182 मुली अशी एकूण 19150 बालके जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झालेली आहेत. तसेच दाखलपात्र वयोगटातील उर्वरित बालके शैक्षणिक सत्र सुरु होईपर्यंत जि. प च्या शाळांमध्येच दाखल होणे अपेक्षित आहे. “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” कार्यक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये यशस्वी होणेकामी पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील तीन वर्षांपासून “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” हा अभिनव उपक्रम राबविणेत येतो. गतवर्षीपेक्षाही या उपक्रमास यावर्षी चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. यावर्षी जिल्हा परिषद शाळांमार्फत दाखलपात्र बालकांच्या गृहभेटी, शाळांची रंगीत जाहिरात पत्रके, दुरध्वनी व एस.एम.एस.व्दारे पालकांचे उद्बोधन अशा पद्‌धतीने व्यापक जनजागृती करणेत आली. याशिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविणेत येणा-या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शालेय कामात समाजाचे सहकार्य वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल होणाऱ्या बालकांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे असे आवाहन करणेत येत आहे.

अ. क्र.गटाचे नंावसर्व्हेक्षणानुसार 6+ वयोगटातील दाखलपात्र संख्या  पैकी गुढीपाडव्यादिवशी  दाखल  विद्यार्थी संख्यादाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी)
मुलेमुलीएकूणमुलेमुलीएकूण
1आजरा513488100136837073873.73
2भुदरगड7466651411667622128991.35
3चंदगड100710642071844895173983.97
4गडहिंग्लज9778611838623535115863.00
5गगनबावडा25522948424121745894.63
6हातकणंगले213218553987777724150137.65
7कागल137011192489963810177371.23
8करवीर27062135484115421331287359.35
9पन्हाळा15211341286211241054217876.10
10राधानगरी1428121026381080951203176.99
11शाहुवाडी107710292106979929190890.60
12शिरोळ141911832602760744150457.80
 एकूण151511317928330996891821915067.60

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत – जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम सेवकांचा सत्कार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हयात उत्कृष्ट काम करणा-या ग्राम सेवकांचा सत्कार

(जिल्हा समन्वय सभेत जिल्हयातील 4 ग्रामसेवकांचा गौरव )

कोल्हापूर : दि. 9/3/2017

      जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत आज रोजी समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेमध्ये जिल्हयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत -उत्कृष्ट काम करणा-या ग्राम सेवकांचा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गौरव केला.

सर्वच विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीमध्ये सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.पाणी व स्वच्छता विभागाचा ही आढावा घेताना जिल्हयातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे ग्राम सेवक श्री.के.पी.पोवार, ग्राम पंचायत कोलीक, ता.पन्हाळा यांनी शौचालय बांधकामसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजार भोगाव येथील हार्डवेअर दुकानदारास स्वत:  र.रू.50000/- देवून साहित्य खरेदी केले आणि बांधकामासाठी शेजारच्या गावातून 10 गवंडी गोळा करून 100 % शौचालय बांधकाम पूर्ण केले.तसेच ग्राम सेवक श्री.पोपट जगताप,ग्रामपंचायत,पोंंबरे,ता.पन्हाळा यांनी देखील बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी र.रू.10000/- हार्डवेअर दुकानदारास स्वत: दिले तर या ग्राम पंचायतीच्या सरपंचांनी साहित्य खरेदीसाठी चेन गहान टाकून लाभार्थ्यांना साहित्य खरेदी करून दिले व गाव 100%हागणदारीमुक्त केले.  दुर्गम भाग असून देखील गावक-यांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ग्राम सेवकांनी केलेल्या कामाचा गौरव या आढावा सभेत करण्यात आला.

ग्राम पंचायत पटट्ण कोडोली,ता.हातकणंगले या ग्राम पंचायतीचे उदद्ीष्ट 1200 पेक्षा जास्त होते.या उदद्ीष्टपूर्तीसाठी हे गाव मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दत्तक घेतले होते. ग्राम सेवक श्री.एस.पी.कांबळे,यांनी नियोजनबध्द काम करून ही ग्राम पंचायत  हागणदारीमुक्त केली.या बदद्ल त्यांचा सत्कार देखील मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला.

ग्राम पंचायत आगरभागचे ग्राम सेवक श्री.सी.एम.कांबळे ,ता.शिरोळ यांनी   आपली ग्राम पंचायत हागणदारीमुक्त केली शिवाय त्यांनी गावात निर्माण होणा-या सांडपाण्याला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी गावामध्ये नांदेड पॅटर्नचे 350 शोषखडडे् तयार केले आहेत.या कामास सुरूवातील ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या ,कामास विरोध झाला पण हे काम त्यांनी यशस्वी केले. यावेळी सर्व ग्रामसेवकांनी मनोगत व्यक्त करून शौचालय उदद्ीष्टपूर्तीसाठी केलेल्या कामाबाबत माहिती सांगितली. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी   ग्रामसेवकांचा गौरव करून सर्व तालुक्यात याप्रमाणे उदद्ीष्टपूर्ती करणेबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या.

या आढावा बैठकीसाठी जिल्हयातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्वात जास्त उदद्ीष्ट असणा-या 10 ग्राम पंचायतींना देखील आढाव्यासाठी उपस्थित होत्या.(ग्रा.पं.हेर्ले- 222,रेंदाळ-266,रूकडी-301,कबनूर-317,शिरोली-361,हुपरी- 422,ता.हातकणंगले,ग्रा.पं.शिरोळ-315,अब्दुल लाट- 448,दानोळी-223,ता.शिरोळ) या सर्व ग्राम पंचायतींना  माहे,मार्च अखेर गावे हागणदारीमुक्त करण्याबाबत  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केले आहे.