पुणे विभागीय प्रदर्शन 2017

पुणे विभागीय प्रदर्शन 2017

महिला स्वयंसहाय्यता समुहंानी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे पुणे विभागीय विक्री प्रदर्शन दख्खन जत्रा- पुणे 2017 दि.27 ते 31 मार्च 2017 या कालावधीमध्ये गणेश कला क्रिडामंच,  स्वारगेट, पुणे येथे आयोजित करणेत आले आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होणेच्या उद्देशाने स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची चळवळ हा एक प्रभावी मार्ग ठरला असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तंूना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून विभागीय प्रदर्शन प्रत्येक वर्षी  विभागातील 5 जिल्हयापैकी 1 जिल्हयामध्ये आयोजितकरणेत येते त्याचा चंागला उपयोग समुहातील महिलंाना नक्कीच होतेा.

पुणे विभागीय प्रदर्शनसाठी कोल्हापूर जिल्हयातुन 10 महिला स्वयंसहाय्यता समुह पाठविणेत आलेले आहेत. त्यापैकी 3 समुह कोल्हापुरी तंाबडा/पंाढरा रस्सा तसेच कोल्हापूरी शाकाहारी/मंासाहारी जेवण तयार करतात, 1 समुह नाष्टा तयार करणेचे काम करतो. याबरोबर पेढे,बर्फी, व विविध प्रकारच्या चटण्या व गावरान कडधान्य, कोल्हापुरी चटणी मसाला, मातीची भंाडी, बेदाणे, मध, आयुर्वेदिक औषधे (मुठळा), आईल पंप/ पेस्ट कंट्रोल असे उत्पादन असलेले वस्तुचे 6 समुह पाठविणेत आलेले आहेत. /

सदर 10 समुहातील महिलंाना ॲानलाईन विक्रीसाठी मोबाईल ॲप उाऊनलोड करुन त्याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणेत आलेले आहे, याचा उपयोग करुन या समुहातील महिला त्यांच्या मालाची ऑन लाईन विक्रीही करु लागल्या आहेत. तसेच प्रदर्शन ठिकाणी 5 समुह मोबाईल ॲपचा वापर करत आहेत.

मा अध्यक्षसो जि प यांचेकडून प्राप्त वृत्त प्रसिद्ध करणेबाबत

सर्वांना नमस्कार

मी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दि. 21/03/2017 रोजी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला त्याच दिवशी स्त्री भ्रूण हत्येविषयी परखड मत मांडलेले होते. स्त्री भ्रूण हत्येची मला अत्यंत चीड असून याबाबत मी कठोर कारवाई करणार आहे.म्हैशाळ जि.सांगली येथील घटनेपाठोपाठच नाशिक येथील शासकीय रूग्णालयामध्ये स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार घडणे ही पूरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत घृणास्पद घटना आहे. आजच्या युगात अशा प्रकारच्या घटना घडणे हे माझ्यासारख्या सुजाण नागरिकाला अत्यंत खेददायक आहे या प्रकाराचा मी अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. मी स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने या प्रकारच्या घटना कोल्हापूर जिल्हयामध्ये घडू नयेत यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, सी.पी.आर व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच सर्व संबंधित आरोग्य विषयक घटकांना कडक सूचना देणार आहे.

 

आपल्या विश्वासू,

(सौ. शौमिका अमल महाडिक)

अध्यक्षा,

जिल्हा परिषद कोल्हापूर

शाळासिध्दी गुणवत्तेची गुरूकिल्ली शाळासिध्दीत कोल्हापूर राज्यात अव्वल

   शाळासिध्दी गुणवत्तेची गुरूकिल्ली

शाळासिध्दीत कोल्हापूर राज्यात अव्वल

 

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ (NUEPA) दिल्ली, तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली शालेय गुणवत्ता सुधारणेसाठी शाळासिध्दी तथा शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम निर्माण केला आहे.या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने दि. 30 मार्च 2016 रोजी शाळासिध्दी शासन निर्णय केला, ज्यायोगे राज्यातील सर्व शाळांनी शाळासिध्दी कार्यक्रम राबविणे अनिवार्य केले गेले. याचपाठोपाठ दि. 16 सप्टेंबर 2016 व 7 जानेवारी 2017 रोजी शाळासिध्दी साठी पूरक शासन निर्णय केले.प्रत्येक शाळेने त्यांच्या स्व-सुधारणेसाठी उपाय योजणे व त्यासाठी सक्षम पाऊल उचलणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहेत.शासन निर्णयानुसार न्यूपा (NUEPA) दिल्ली यांनी ‘¿ÖÖôûÖ×ÃÖ¬¤üß’ नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ (www.shalasiddhi.org) निर्माण केले होते. या संकेतस्थळावर देशातील सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी स्वयंमूल्यमापन व रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते. दि. 28 फेब्रुवारी 2017 अखेर देशातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन तसेच स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 3683 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे.

न्यूपाने दिलेल्या लिंकवर प्रत्येक शाळेने स्वत:चा युडायस कोड वापरून पासवर्ड क्रिएट करून रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर शाळासिध्दीच्या 7 मानकांनुसार 45 उपक्षेत्रात स्वत:च्या शाळेचे स्वयंमूल्यमापन 999 गुणांपैकी करावयाचे बंधनकारक केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाच्या 7 मानकांनुसार तालुका, केंद्र व शाळानिहाय अंमलबजावणीचे भरीव नियोजन तथा ॲक्शन प्लॅन तयार केला. याचा पहिला टप्पा म्हणजे जुलै 2017 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यनिर्धारक यांच्या सहकार्याने शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी कोल्हापूर डाएट येथे प्रत्येक तालुक्यातून कृतीशील शिक्षकांची टीम तयार केली व या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये शाळासिध्दीची 7 मानके व त्यानुसार उपक्रम व कार्यक्रम कसे विकसित करायचे यावर चर्चा केली. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून मुख्याध्यापकांनी क्षेत्रनिहाय कोणते अभिलेख ठेवायचे, तसेच पुरावे ठेवावयाचे याचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत केले गेले.

कोल्हापूर जिल्ह्यातील 3683 पैकी 610 शाळा श्रेणीत आहेत. एकंदरीत राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध शाळांपैकी श्रेणीतील शाळा असण्याचे कोल्हापूरचे शेकडा प्रमाण (16.55 %) हे राज्यात अव्वल असून कोल्हापूरने आणखी एकदा गुणवत्तेत आपले स्थान अधोरेखित केले आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील 1012 शाळा या ‘ब’ श्रेणीत आहेत. उर्वरीत 919 ‘क’ श्रेणी व 628 ‘ड’ श्रेणीत आहेत.या स्वयंमूल्यमापनानंतर विद्या परिषद, पुणे यांचेकडून ‘अ’ श्रेणीतील शाळांचे बाह्यमूल्यमापन होणार असून त्यासाठी 2000 पेक्षा अधिक निर्धारक राज्यभरातून प्रशिक्षित केले आहेत. शाळा बदलून हे निर्धारक बाह्यमूल्यमापन करणार आहेत. ही प्रक्रिया दि. 10 एप्रिल नंतर करण्याचे नियोजित असून सदरचे आदेश त्याच दिवशी प्राप्त होतील.स्वयंमूल्यमापनात ज्या शाळा ‘अ’ श्रेणीत आहेत त्यांचेच बाह्यमूल्यमापन होईल. अशा प्रत्येक शाळेला निर्धारक भेट देऊन 2 दिवस पुरावे, अभिलेखे यांची पडताळणी करून तद्संबंधीचे गुणदान विद्या परिषदेकडे गोपनीय स्वरूपात संकेतस्थळावर देतील. यानंतर पात्र शाळांना SS2016 असे प्रमाणपत्र शासनाकडून दिले जाईल, ज्याची वैधता 5 वर्षे असेल. 5 वर्षांनंतर बदलता शिक्षणप्रवाह व गरजानुरूप 7 मानकांत बदल केले जातील व त्यावेळी पुन्हा असे मूल्यमापन करणे बंधनकारक राहील.एकंदरीत शाळासिध्दी या राष्ट्रीय मूल्यांकनाच्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल राहील व शाहूंचा शिक्षण वारसा जोपासला जात आहे असेच चित्र दिसते. यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुणाल खेमनार व शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांचे मार्गदर्शन मिळाले असून सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी भुदरगड येथे रोटरी मार्फत कार्यशाळेचे आयोजन

जिल्हा परिषद, कोल्हापूर  व  रोटरी क्लब ऑफ सनराईज ,कोल्हापूर  यांच्या संयुक्त विदयमाने  “रचनावाद- एक नवी दिशा या कार्यशाळेचे आयोजन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मौनी विदयापीठ, गारगोटी, ता.भुदरगड येथे दि.27/03/2017 इ.रोजी करणेत आले होते. या कार्यशाळेच्या  उद्घाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले म्हणाले, “बालकाच्या प्रगतीच्या दृष्टीने     ज्ञानरचनावादी पध्दतीचे शिक्षण आवश्यक आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी कृतीयुक्त अध्यापनाद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे. रचनावाद समजून वर्गातील प्रत्येक बालक प्रगत करणेसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. बालकाला समजून घेताना त्याचे बालमानसशास्त्र समजून घेणे, मानवी मेंदूची रचना समजून घेणे आवश्यक आहे. रोटरीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेसाठी  TEACH  या उपक्रमामधून राबविले जाणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत.”

या कार्यशाळेत भूदरगड तालुक्यातील 166 शिक्षक, सर्व केंद्रप्रमुख यांना प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमंत माईसाहेब बावडेकर संस्थेच्या अध्यक्षा नितूदेवी बावडेकर यांनी सहज सोप्या भाषेत रचनावाद, मेंदूचा विकास समजावून दिला. ज्ञानरचनावादाची संकल्पना तत्वे यामध्ये शिक्षकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. गटकार्य अनौपचारिक चर्चा यातून रचनावादाचे महत्व त्यांनी अधोरेखीत केले.

कार्यशाळेचे उद्घाटन रोटरीचे प्रेसिडंट सचिव झंवर यांचे हस्ते करणेत आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी,भुदरगड दिपक मेंगाणे, जिल्हा शिक्षणविस्तार अधिकारी  दिपक कामत, ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य अर्जून आबिटकर, रोटरी सेक्रटरी कालेकर,केदार कुंभोजकर ,शिशिर शिंदे, अशोक भोई हे उपस्थित होते. सुत्रसंचालन पी.डी.कांबळे यांनी केले.

सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, ता.गगनबावडा कडील रिक्त पदाची भरती

जाहिरात

 

 

सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर

 

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, ता.गगनबावडा कडील रिक्त  पदाची भरती

कोल्हापूर जिल्हयातील गगनबावडा गटामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेमार्फत नवोदय विदयालयाचे धर्तीवर कस्तुरबा गांधी बालिका विदयालय इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणा-या शाळाबाहय व अर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील मुलींसाठी निवासी स्वरुपात सुरू आहे. या विदयालयाच्या  वसतीगृहाकडील खालीलप्रमाणे  रिक्त पदे भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत येत आहे.  सदरची पदे पूर्णपणे हंगामी स्वरुपाची असून कंत्राटी स्वरुपावर सहा महिने कालावधीसाठी भरणेत येणार आहेत.  नियुक्ती कालावधीत काम समाधानकारक असलेस पुढील नियुक्तीबाबत विचार करणेत येईल. कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाकरीता नियुक्ती करणेत आलेल्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता / व्यावसायिक अर्हता व मासिक परिश्रमिक वेतन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मंुबई यांनी निश्चित केलेप्रमाणे राहील.  त्याबाबत जे आदेश वरिष्ठ कार्यालयाचे प्राप्त होतील ते पाळणे संबंधितांना बंधनकारक राहील.

 अ. क्र.पदाचे नांवपदांची संख्याआरक्षणशैक्षणिक अर्हता अनुभवपारिश्रमिक (मानधन- कंत्राटी पद्धतीने)
1गृहप्रमूख1खुला महिलाबी.ए.बी.एड्./बी.एस्सी.बी.एड्.+2 वर्षाचा अनुभव25000/-
2लेखापाल01खुला महिलाबी.ए./बी.कॉम+एम.एस.सी.आय.टी.+ मराठी टायपिंग 30 w.p.m. + इंग्रजी टायपिंग 40 w.p.m.

(बी.कॉम पदवीधर,संगणकाचे सखोल ज्ञान ü व लेखाविषयक कामकाजाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणा-या व्यक्तीस  प्राधान्य.)

7000/-
3सहा.स्वयंपाकी1अनु.जाती महिला  साक्षर4500/-
4शिपाई1खुला महिला  सातवी पास5000/-

 

सदर पदांच्या अटी शर्ती  

1) सदरचे पद कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाच्या प्रकल्प कालावधी साठी पुर्णपणे हंगामी स्वरुपाचे असून सदर पदांस शासन सेवेचे नियम लागू  नाहीत.

2) सदर पदांवरील नेमणूक त्यांचे नावासमोर दर्शविलेप्रमाण्‌े एकत्रित पारिश्रमिकावर सहा महिन्याच्या कालावधीसाठी  करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपाच्या करणेत येणार आहेत.

3) वयोमर्यादा दि. 01/04/2017 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पुर्ण व कमाल वयोमर्यादा सर्वसाधारण

उमेदवारांसाठी 33 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 38 वर्षे राहील.

4) आरक्षण प्रवर्गानुसार रिक्त पदांवर उमेदवार न मिळालेस सदर पदावर अन्य प्रवर्गातील उमेदवारांची निवड करणेचा

अधिकार  निवड समितीस राहील.

5) नियुक्त झालेल्या उमेदवारानी विहित  नमुन्यातील सेवा करारनामा करून देणे बंधनकारक राहील.

6) सदरचे विद्यालय निवासी स्वरूपाचे असलेने गृहप्रमूख पदासाठी  निवड झालेल्या उमेदवारांनी विद्यालयात निवासी

राहणे

बंधनकारक आहे. व अन्य पदासाठी  निवड झालेल्या उमेदवारांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक राहिल.

7) उमेदवारानी अर्ज मा. सदस्य सचिव, कस्तुरबा गांधी बालिका विदयालय निवड समिती, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा

परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर यांचे नावे  दि.10 /04/ 2017 पर्यत करणेचा आहे.

8) उमेदवारानी अर्जाच्या लखोटयावर पदाचे नाव व कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाकडील रिक्त पदासाठी अर्ज असे

सुस्पष्टपणे नमूद करावे.

9)  अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रती जोडाव्यात.

10) निवड करणेबद्दलचे सर्व अधिकार निवड समितीस राहतील.

11) उमेदवारास लेखी परिक्षा अथवा  मुलाखतीस उपस्थित राहणेबाबत दैनिक भत्ता तसेच प्रवास भत्ता देय नाही.

12) सदर पदांसाठी देणेत आलेली जाहीरात अथवा मुलाखतीचा कार्यक्रम काही तांत्रिक अडचण उदभवल्यास स्थगित अथवा

रद्द करणेचा अधिकार निवड समितीस राहील. याबाबत कोणत्याही प्रकारची हरकत विचारात घेतली जाणार नाही.

ठिकाण :- कोल्हापूर

दिनांक :-   29 /03/2017.

 

 

 

सही/-                                                                         सही/-

     सचिव जिल्हा निवड  समिती                                                                अध्यक्ष जिल्हा निवड  समिती                                                                    कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय                                                      कस्तुरबा गांधी  बालिका विद्यालय,             गगनबावडा.  तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.)                           गगनबावडा.  तथा जिल्हाधिकारी, कोल्हापूर

                                                                

                जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

 

 

 

 

 

                                  आवेदन पत्राचा नमुना

सर्व शिक्षण अभियान,शिक्षण विभाग (प्राथमिक)जिल्हा परिषद कोल्हापूर

कस्तुरबा गांधी बालिका विदयालय गगनबावडा कडील रिक्त पदाच्या भरती बाबत

                                            अर्ज

सेवायोजनÖ कार्यालय

नोंदणीß क्रमांक

प्रति मा.सदस्य सचिव

कस्तुरबा गांधी बालिका विदयालय निवड समिती तथा

शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांगाळा पार्क,कोल्हापूर

 

 

 

विषय कस्तुरबा गांधी बालिका विदयालय गगनबावडा कडील रिक्त पदाच्या भरती बाबत अर्ज

 

  • उमेदवाराचे नांव (देवनागरी)

आडनांव प्रथम ————————————————————————————————

  • लिंगÖ : पुरुष स्त्री
  • पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर:- ————————————————-

—————————————————————————————–

4) कायमचा पूर्ण पत्ता    : —————————————————————————————————————-

5) जन्मतारीख : अंकी

अक्षरी  ———————————————-

6) दिनांक :        01/04/2017          रोजी उमेदवाराचे वय –

वर्षे              महिने            दिवस

7) जात व प्रवर्ग :

8) विशेष आरक्षण असलेस

9) शैक्षणिक अर्हता :

अ.क्रं.उर्तीर्ण झालेली परिक्षायुनिर्व्हसिटी बोर्डघेतलेले विषयमिळालेले शेकडा गुणउर्तीर्ण झालेले वर्ष
 

 

 

 

 

 

10) अनुभव :

ज्या संस्थेत काम केले आहे त्या संस्थेचे नांवकालावधीकामाचे स्वरूपशेरा
पासूनपर्यंत
 

 

 

 

                                                                                                                                                                             प्रतिज्ञापत्र

वर नमूद असलेला तपशील माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे. नमूद केलेली माहिती चुकीची अगर खोटी आढळलेस मी कारवाईस पात्र राहीन व माझी केलेली नेमणूक रद्द होईल याची मला पूर्ण जाणीव आहे.

 

 

                                                                                                                                                                                                                                        उमेदवाराची स्वाक्षरी नांव

 

सोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्रांच्या प्रती जोंडलेल्या आहेत.

 

1) दहावी ,बारावी, पदवी,MSCIT,संगणक पदवी,अनुभव इ.गुणपत्रक व प्रमाणपत्राच्या  छायांकीत व स्वाक्षांकीत केलेल्या

प्रति

2) उमेद्वार मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र/जात वैद्यता प्रमाणपत्र आवश्यक.

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – दुसरी फेरी

   आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दुसरी फेरी

 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत दि. 02/03/2017 अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 1330 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विद्यार्थी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 1159 पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश  घेणेसाठी SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे पाठविणेत आले होते. दि. 25/03/2017 इ. रोजी पहिली फेरी समाप्त झालेली असून पहिल्या फेरीअंती एकूण 524 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला आहे. 210 विद्यार्थी अपात्र ठरले असून 425 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही.

दि. 30/03/2017 इ. रोजीपासून विद्यार्थी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होत आहे. दुस-या फेरीसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे पात्र 51 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 51 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. दुस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशासाठी अंतिम तारीख 08/04/2017 आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी केले आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे पहारेकरी करिता ई निविदा

जिल्हा परिषद कोल्हापूर बांधकाम विभाग

 

 जाहिर संक्षिप्त ई-निविदा सूचना क्र.  95    सन 2016-17

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील  मुख्य प्रशासकीय इमारत (3), कागलकर हाऊस (3), मा.अध्यक्ष निवासस्थान (3), मा. उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवासस्थान (3), मा. मुख्य कार्यकारी अधिकारी निवासस्थान (3), कदमवाडी निवासस्थान व  परिसरातील देेखभाली करीता   (3) असे एकुण 18 पहारेकरी 1 वर्ष कालावधी करिता   घेणे करिता मा. कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून निविदा मागवित आहेत.

कामांची जाहिर ई-निविदा सूचना क्र.     95 /2016-17 http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर

दि.   27/03 /2017, सकाळी 11.00 वाजलेपासून प्रसिध्द करणेत येत आहे.

Sr. NoName of workAmount put to tenderTender Form costE.M.D. (1%)
1Providing  watchman For Z.P. Administrative Building,President,Z.P.Kolhapur Residence,Kagalakar House,Vice President & Chairman Residence,C.E.O. Residence,Z.P. Quarters,Kadamwadi Z.P.Quarters,1761782.002000.0017618.00

सदर कामांची विस्तृत जाहिर निविदा सूचना “http://mahatenders.gov.in” व “www.zpkolhapur.info”µÖÖ संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

 

 

कार्यकारी अभियंता ( बांधकाम )                        अति. मुख्य कार्यकारी अधिकारी                       सभापती, बांधकाम आरोग्य समिती                                                                                               

   जिल्हा परिषद कोल्हापूर                                         जिल्हा परिषद कोल्हापूर                                  जिल्हा परिषद कोल्हापूर                                     

जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना दिला जाणारा राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न

जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना दिला जाणारा राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आदर्श समोर ठेवून ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी व गोरगरिब यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद विविध योजना राबवित असते. जिल्हा परिषद सदस्य/पंचायत समिती सदस्य आपल्या मतदारांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. निरनिराळया योजना जास्तीत-जास्त आपल्या मतदार संघामध्ये राबविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे आपल्या मतदार संघातील विकास कामाबरोबरच ग्राम पातळीवरुन ते जिल्हा पातळीपर्यंत सहकार, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये काम करीत असतात.

कोल्हापूर जिल्हा परिषदे मार्फत सन 2000 पासून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद कर्मचारी यांना दरवर्षी राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कार प्रदान केले जातात. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसाठी सहकार, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाचा विचार करुन पुरस्कारसाठी निवड केली जाते. दरवर्षी राजर्षि छत्रपती शाहू जयंतीच्या निमित्ताने पुरस्कारासाठी निवड करणेत आलेल्या सन 2014, 2015 व 2016 मधील असे एकुण 15 जि.प. व पं.स.सदस्य यांना सपत्नीक जिल्हा परिषदेचे मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व राजर्षि शाहू छत्रपती यांचे आठवणी म्हणून  पुस्तक, व  शाल श्रीफळ देऊन सन्मानित करणेत आले आहे.

पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यादी

अ.नं.

नाव

पद व मतदारसंघाचे नाव

सन 2014

1

श्री.अरुणराव जयसिंगराव इंगवले

जिल्हा परिषद सदस्य, मतदार संघ – हातकणंगले ता.हातकणंगले

2

श्री.शशिकांत शामराव खेात

जिल्हा परिषद सदस्य, मतदार संघ – गोकुळ शिरगावं ता.करवीर

3

सौ.विमल पुंडलिक पाटील

जिल्हा परिषद सदस्या, मतदार संघ- सांगरूळ ता.करवीर

4

सौ.शालिनी बयाजी  शेळके

सभापती, पंचायत समिती,गगनबावडा

5

कु.रतिपौर्णिमा रविंद्र कामत

पंचायत समिती सदस्य, मतदार संघ – नादवडे ता.भुदरगड

सन 2015

1

सैा. आकांक्षा अमरसिंह पाटील

जिल्हा परिषद सदस्या, मतदार संघ – शितुर तर्फ़ वारुण  ता. शाहुवाडी

2

श्री. विकास शामराव कांबळे

जिल्हा परिषद सदस्य, मतदार संघ – शिरोळ    ता. शिरोळ

3

सैा.मेघाराणी गुरुप्रसाद जाधव

जिल्हा परिषद सदस्या, मतदार संघ- तिसंगी ता. गगनबावडा

4

सैा.भाग्यश्री भारत पाटील

जिल्हा परिषद सदस्या, मतदार संघ- कोडोली ता.पन्हाळा

5

सैा. अनिता अमरसिंह माने

पंचायत समिती सदस्य, मतदार संघ- शिरोळ ता. शिरोळ

सन 2016

1

मा. सौ. शैलजा सतीश पाटील

जिल्हा परिषद सदस्या,कडगांव मतदार संघ,ता.गडहिंग्लज

2

मा. सौ. दीपा राजेंद्र पाटील

जिल्हा परिषद सदस्या,राशिवडे बु. मतदार संघ, ता.राधानगरी

3

मा. श्री.देवानंद बापूसाो कांबळे

जिल्हा परिषद सदस्य कोरोची, मतदार संघ ता.हातकणंगले

4

मा. सौ. सुजाता वसंत पाटील

जिल्हा परिषद सदस्या,कळे मतदार संघ, ता.पन्हाळा

5

मा. सौ. स्मिता युवराज गवळी

सभापती, पंचायत समिती, करवीर

तसेच जिल्हा परिषदेकडील नवीन उपाहारगृहाचे, जि.प. कडील अधिकारी यांनी दैनदिनी लिहिणे सुलभ व्हावे व रोजच्या रोज लिहीली जावी यासाठी  जि.प. डायरी ॲप हे नवीन ॲप्लिकेशन  तसेच जि.प. संकेतस्थळाचे उद्घाटन मा. एस. चोक्कलिंगम्, विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे शुभहस्ते व मा. सौ विमल पुंडलिक पाटील,अध्यक्ष जि.प.कोल्हापूर यांचे अध्यक्षते खाली पार पडला असून सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा डॉ अमित सैनी, जिल्हाधिकारी हे उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झालेनंतर सौ स्मिता गवळी, सभापती पं.स. करवीर, सौ. भाग्यश्री भारत पाटील, श्री.अरुण इंगवले, सौ.मेघाराणी जाधव, सौ. शैलजा पाटील, तसेच श्री विकास कांबळे जि.प.सदस्य व शशिकांत खेात उपाध्यक्ष यांनी मनोगते व्यक्त केली. यानंतर मा चंद्रकांत वाघमारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) यांनी सर्वाचे आभार मानले.

मा श्री शशिकांत खोत, उपाध्यक्ष, जि.प.कोल्हापूर, सर्व विषय समिती सभापती तसेच, मा. डॉ. कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी, व  श्री चंद्रकांत वाघमारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र), श्री एम.एस.घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), श्री तुषार बुरुड कार्यकारी अभियंता (बांधकाम) व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम सविता रविंद्र कुंभार,अध्यापीका व प्रा. पवण पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय सचिव अनिल स्वरूप

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक असून, शाळांनी अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. इतर राज्यांतील शिक्षक, अधिकारी व मान्यवरांनी या शाळा पाहाव्यात, असे चांगले उपक्रम शाळा-शाळांमधून राबविले जात असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील काही शाळांना त्यांनी भेटी दिल्या आणि कामकाजाचे कौतुक केले.

ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेची पटसंख्या १४२ असून, शाळेला ‘आयएसओ मानांकन’ प्राप्त झाले आहे. शाळेमधील ज्ञानरचनावाद, ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थी घेत असलेले शिक्षण, तिसरीपासून सातवीपर्यंत संगणक हाताळणारे विद्यार्थी, साडेतीन लाख रुपयांच्या लोकसहभागातून केलेला शैक्षणिक उठाव, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश स्टेशन, सुसज्ज रंगकाम या भौतिक सुविधा पाहून सचिव प्रभावित झाले. अभिनव पालकर याचा देशापातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करतानाच विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण ऐकूनही त्यांनी समाधान व्यक्त केले. याच तालुक्यातील करंबळी तालुक्यातील सहावीचे ३४ विद्यार्थी टॅबचा वापर करतात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील शिक्षक अध्यापनात स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात त्याचे सचिवांनी कौतुक केले. कन्या विद्यामंदिर (ता. हातकणंगले)येथील लेझीम पथक, पहिलीच्या वर्गात राबविण्यात येणारा शब्दांचा डोंगर व शब्दांची अंताक्षरी याचे वाचन त्यांनी घेतले. जिल्ह्णातील चांगले उपक्रम पाहण्यासाठी राज्यातील शिक्षक कोल्हापूरला येतील असे स्वरूप यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपाध्यक्ष शशिकांत खोत, सभापती मीना पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना भेटी दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले त्यांच्यासमवेत होते.