विद्यामंदीर बालिंगे येथे शाळा भेटी दरम्यान शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल साहेब सोबत मा.राजू सुर्यवंशी साहेब सभापती पं.स.करवीर

आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी विद्यामंदीर बालिंगे येथे शाळा भेटी दरम्यान शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल साहेब सोबत मा.राजू सुर्यवंशी साहेब सभापती पं.स.करवीर यावेळी मा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी शाळा डिजिटल केलेबद्दल व सॉफ्टवेअर चा वापर सुरू असलेबाबत समाधान व्यक्त केले.

 

 

 

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू

केंद्र शासनाच्या वतीने दिनांक  13 जुलै, 2018 रोजी “स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्व्हेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ठ ठरणा-या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन दि. 2 ऑक्टोंबर 2018 रोजी ,महात्मा गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे.

सर्वेक्षणासाठी केंद्र शासनामार्फत निवडण्यात आलेल्या के. आर. सी मार्फत गावांची तपासणी सुरू आहे. या सर्वेक्षणांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील ग्राम पंचायत बाजारभोगावं व इंजोळे या गावांची व राधानगरी तालुक्यातील ग्रा. पं. कोते या गावाची के. आर.सी मार्फत  तपासणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित गावांची देखील क्रमाने तपासणी होणार आहे.

            केंद्र शासनाने निवडलेल्या या संस्थेकडुन सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण  होणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रें, सर्व प्रार्थना स्थळे / मंदिर ठिकाण, यात्रास्थळे, बाजाराची ठिकाणे, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे इत्यादि स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

“स्वच्छ सर्वेक्षण- ग्रामीण 2018” अंतर्गत गावस्तरावर गावचे लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, निगराणी समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातुन पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातुन सर्वेक्षण केले जाणार आहे. उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्हयांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (IMIS) विकसित केली आहे.

या सर्वेक्षणांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्या आधारे माहिती गोळा केली जाणार आहे. यातंर्गत स्वच्छतागृहींची खुली बैठक ,व्यक्तीगत मुलाखती, सामुहिक चर्चा करुन प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेले उपक्रम याची पाहणी केली जाणार आहे. स्थानिक नागरीकांकडुन प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृती, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे गाव पातळीवर स्थानिक पुढाकाराने उभारण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाणार आहे.

या सर्वेक्षणाचा महत्वाचा भाग म्हणजे या सर्वेक्षणासाठी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत. यासाठी प्ले स्टोअरवरून ssg 18 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य निवडून व कोल्हापर जिल्हयासाठी स्वच्छतेबाबत विचारलेल्या 4 प्रश्नांना सकारात्मक  उत्तरे द्यावयाची आहेत. कोल्हापूर  जिल्हयाला जास्तीत जास्त मते मिळतील व कोल्हापूर जिल्हा या सर्वेक्षणामध्ये अव्वल येईल. यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांनी या ॲपव्दारे स्वच्छता मतदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मा. सौ. शौमिका महाडीक व  प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. डॉ. आर.पी. शिवदास यांनी केले आहे.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ

14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ

 

जगभर धोका निर्माण केलेल्या गोवर रुबेला या प्राणघातक  रोगावर नियंत्रणासाठी  जिल्हयातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.  या महत्वाकांक्षी मोहिमेचे नियोजनासाठी  दिनांक 3 4 ऑगस्ट 18 रोजी कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना  श्री. अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणाले की, या मोहिमेसाठी आारोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, खाजगी वैदयकीय व्यवसायीक, लोकप्रतिनिधी , माध्यमे यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे  असे  कार्यशाळेच्या मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना नमुद केले.  जागतिक आरोग्य संघटनेचे, सर्व्हिलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत खैरनारे कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक होते.

प्रस्ताविकात बोलतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे म्हणाले की,  गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे सुक्ष्म नियोजन मा. शौमिका महाडिक, अध्यक्षा जि.प. कोल्हापूर, मा. सर्जेराव पाटील, सभापती आरोग्य समिती,  डॉ. रवि शिवदास, मु.का.अ यांच्या मार्गदर्शना खालील करण्यात आले आहे. मोहिम यशस्वी होणेसाठी बिनचुक मायक्रोप्लॅन, प्रसार, प्रचार, वातावरण निर्मिती आवश्यक आहे असे नमुद केले. जिल्हयातील अंदाजे 10 लाख 50 हजार बालकांना या मोहिमेत गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.

कार्यशाळेस डॉ सी जि शिंदे प्रायार्य कुटूबं कल्यान प्रशिक्षण केंद, डॉ डि. सी. केंम्पीपाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक, कांेल्हापूर, डॉ विलास देशमूख निवासी वैद्वकिय अधिकारी सि पी आर हास्पीटल, डॉ एफ.ए. देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ डि.एस. थोरात, वैद्वकिय अधिकारी रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, शासकिय वैदयकिय महाविदयालय कोल्हापूर व पी एस एम विभागाचे डॉ हेमंत खैरनारे सर्वेलन्स मेडिकल ऑफीसर, जागतिक आरोग्य संघटना, लायन्स क्ल्ब रोटरी क्लब व आयूर्वेदिक संघटना प्रतिनिधी,  डॉ हेंमत भारती अध्यक्ष इंडियन असोशिशन ऑफ पेडीयाट्क्सि, सर्व तालूका आरोग्य अधिकारी जिल्हयातील सर्व वैदयकिायअधिक्षक  व सर्व  वैछयकिय अधिकारी उपस्थित होते

गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे.  जो मुख्य: बालकांमध्ये  होतो सन 2016 च्या आकडेवारीनूसार गोवर आजारामुळे जवळपास 49200 मुले सपूंर्ण भारतामध्ये दरवर्षी मृत्यमुखी पडतात. रुबेला हा त्यामानाने सौम्य संक्रामक  आजार आहे. जो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तीनां देखाील होतो. परंतू जर गर्भवती  स्त्रीयांना रुबेला या आजारांचा संसर्ग झाला तर या मूळे अचानक गर्भपात किंवा जन्मजात दोष  जसे अंधत्व बहिरेपणा आणि ़हदयविकृती होवू शकते. हे बालक जन्मजात रुबेला सिंडोम  (सीआरएस) म्हणून ओळखले जाते असे बालक त्या कुटूंबासाठी, समाजासाठी सुध्दा ओझे लादल्यासारखे आहे

भारत सरकारणे सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे. या साठी भारत सरकार टप्याटप्याने गोवर रुबेला ही लस विविध राज्यामधिल नियमित लसरकरण कार्यक्रमाध्ये  समाविष्ट करीत आहे. 14 नोव्हेबंर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गाोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या माहिमे अतंर्गत कोल्हापूर जिल्हयातील 9 महिने ते 15वर्षा पर्यंतच्या वयोगटातील एकूण (लोकंसखेच्या 30 टक्के) लाभार्थीचे लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारित केलेलंे आहे.  या पैकी काही लाभार्थ्‌ीना जरी या मोहिमेआगोदर गोवर रुबेला लस दिलली असेल तरी सुध्दा त्याना हा अतिरिक्त डोस दयायचा आहे. मोहिमेसाठी निर्धारित करणेत आलेल्या वयोगटातील 9 महिने ते 15 वर्षापर्यंत एकूण लाभार्थी पैकी 60 ते 65 टक्के लाभार्थी हे शाळेत जाना-या विद्यार्थ्यापैकी आहेत.

गोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शासकिय व खाजगी शाळेमध्ये अगंणवाडी केंद्र आरोग्य उपकेंद्र तसेच सर्व प्रा आ केद्राध्ये व लसीकरण सेवा सत्राच्या ठिकाणी 4 ते5 आठवडयाच्या कालावध्ीामध्ये घेण्यात येणार आहे. या माहिमेमध्ये शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग गृह विभाग माहीती व प्रसारण विभाग रेल्वे विभाग पंचायत राज विभाग ई विभागांचा सहभाग महत्वाचा आहे. मोहिम यशस्वी करणेसाठी ग्रामीण व नागरी विभागामध्ये 100 टक्के लाभार्थीनां लसीकरण  करणे आश्यक आहे

गोवर रुबेला लसीकरण ज्ल्हिास्तरीय कार्यशाळा दि. 03 व 04 ऑगष्ट 2018 रोजी आयोजित करणेत आली होती. या वेळी त्यानी 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या आपल्या बालकाना मिझल रुबेला जंग पुकारणर योध्ये (MR Warriers)  घोषित करुन सर्व विभागांनी सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी जिल्हयातील सर्व शासकिय व सर्व खाजगी शाळानी तसेच शाळाभाळय मोहिमेत सहभागी होवून सहकार्य करावे 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या आपल्या बालकांना मिझल रुबेला डोस घेणसाठी पालकानी प्रोत्सहित करावे व गोवर रुबेला विरुध्द लढा जिंकण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले

 

जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परीषद कोल्हापूर

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम

 

 

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय प्रशिक्षणाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविला जात आहे.

या कार्यक्रमांतर्गत आज जिल्हा परिषदेमध्ये प्रविण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, मा. सौ. शौमिका महाडीक, उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, जि. प. कोल्हापूर, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. वंदना मगदूम, मा. सौ. स्वरूपाराणी जाधव, मा.सौ. विजया पाटील जि. प. सदस्य  यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून युनिसेफच्या प्रतिनिधी मा. श्रीम. अपर्णा कुलकर्णी तसेच जिल्हा परिषद सांगली येथील प्रविण प्रशिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी उपस्थिातांचे स्वागत आणि  प्रास्ताविक मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे,उप मु का अ(पा.व स्व.) यांनी केले व प्रशिक्षणाचा उदद्ेश सांगितला. मासिक पाळी हा विषय अद्याप ही रूढी, परंपरा आणि अंधश्रध्दा यामध्ये बंद आहे.समाजाचा या विषयाबाबतचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे सांगून या प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी चांगल्या पध्दतीचे प्रशिक्षण घेवून हा विषय मुलींपर्यंत पोहोचवावा असे मा.अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर यांनी सांगितले. तर युनिसेफच्या प्रतिनिधी मा. श्रीम. अपर्णा कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. हा विषय अतिशय नाजूक असून या विषयाबाबत मुलींना प्रशिक्षण देताना त्यांना वेगवेगळया खेळांच्या आणि चर्चासत्राच्या माध्यमातून सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषद सांगली येथील प्रविण प्रशिक्षकांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

सदर प्रशिक्षण हे दोन दिवसांचे असून यामध्ये तालुकास्तरावरून शिक्षिका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. हे  प्रविण प्रशिक्षक तालुकास्तरावरील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील आणि ते प्रशिक्षक प्रत्यक्ष शाळांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. प्रशिक्षणादरम्यान मासिक पाळीबाबत माहिती पुस्तिका, हॅन्डबुक आणि लॅमिनेटेड चार्ट असे प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.

 

प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार मा.श्री. सोमनाथ रसाळ,उप मु का.अ (म.बा.क) यांनी मानले. प्रशिक्षणाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले होते.

दिनांक  01/08/2018 इ.रोजी  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती  जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 01/08/2018 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी श्री.मदन  आनंदराव जाधव, अधीक्षक (माध्यमिक शिक्षण विभाग) व श्रीम. जयश्री संजय जाधव विस्तार अधिकारी (शिक्षण) (शिक्षण प्राथमिक विभाग)  यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.

यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री.रविकांत आडसुळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) श्री.राजेंद्र भालेराव,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) श्रीम. प्रियदर्शनी मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) श्री. सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, कृषि विकास अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.राहुल कदम, यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री. संजय  लोढे, विषय तज्ञ यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                                           जिल्हा परिषद, कोल्हापूर

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर: 31.07.2018

 

केंद्र शासनाच्या वतीने दिनांक  13 जुलै, 2018 रोजी “स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्व्हेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ठ ठरणा-या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन दि. 2 ऑक्टोंबर 2018 रोजी ,महात्मा गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम आज जिल्हा परिषद कोल्हापूर येथे संपन्न झाला.

या शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडीक, जि. प. कोल्हापूर, जिल्हा परिषदेच्या प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीम. सुषमा देसाई, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. वंदना मगदूम , जेष्ठ जि. प. सदस्य मा. श्री. अरूण इंगवले, मा. सौ. संध्याराणी जाधव, जि. प. सदस्य  यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम या सर्वेक्षणबाबत तयार करण्यात आलेल्या प्रसिध्दी फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यांनतर जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक, समिती सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्वच्छतेमध्ये नेहमीचं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्य आणि केंद्र स्तरावरचे पुरस्कार ही मिळविले आहेत. यशाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी या सर्वेक्षणासाठी ग्राम स्तरावर आवश्यकत ते सर्व प्रयत्न करावेत असे मा.अध्यक्षा यांनी सांगितले. तर या सर्वेक्षणामध्ये स्वच्छता ॲपव्दारे ग्रामस्थांची मते नोंदविली जाणार असल्याने हे ॲप सर्व ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी तालुका व ग्राम स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी योग्य ती कार्यवाही करणेबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना सूचना दिल्या. या सर्वेक्षणबाबत तयार करण्यात आलेल्या हस्तपत्रिकांचे प्रकाशन ही या वेळी करण्यात आले.

            सर्व्हेक्षणासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड केंद्र शासनाकडुन यादृच्छिक  पध्दतीने केली जाणार आहे. जिल्हयातील सर्वच ग्रामपंचायतींना सदर सर्व्हेक्षणासाठी सज्ज राहावे लागणार आहे. केंद्र शासनाने निवडलेल्या संस्थेकडुन पहिल्या टप्यामध्ये सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण  होणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रें, सर्व प्रार्थना स्थळे / मंदिर ठिकाण, यात्रास्थळे, बाजाराची ठिकाणे, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे इत्यादि स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच या सर्वेक्षणातंर्गत ग्रामीण भागातील नागरीकांच्या स्वच्छतेबाबतच्या व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) बाबतच्या प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रियाही घेण्यात येणार आहेत.

“स्वच्छ सर्वेक्षण- ग्रामीण 2018” अंतर्गत गावस्तरावर गावचे लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, निगराणी समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातुन पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातुन सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हयातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणा-या गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण अंतर्गत सन 2012 मध्ये    झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राहय धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती स्वच्छता व्याप्ती साठी घेतली जाणार आहे. उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्हयांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (IMIS) विकसित केली आहे.

या सर्वेक्षणांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्या आधारे माहिती गोळा केली जाईल. यातंर्गत स्वच्छतागृहींची खुली बैठक ,व्यक्तीगत मुलाखती, सामुहिक चर्चा करुन प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेले उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरीकांकडुन प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृती, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे गाव पातळीवर स्थानिक पुढाकाराने उभारण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षणाचे गुणांकन खालील प्रमाणे होणार आहे.

  • ÃÖ¾ÆìüÖÖÖŸÖᯙ गुणांकन पध्दती

अ) सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरिक्षण                                                               (30 गुण)

यामध्ये शौचालयाची उपलब्धता, शौचालयाचा वापर, कच-याचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या घटकांची पडताळणी होणार आहे.

ब) नागरीकांचे तसेच मुख्य प्रभावी व्यक्तींची स्वच्छतेबाबतची मते, माहिती अभिप्राय (चर्चेव्दारे व  ऑनलाईन  ॲपव्दारे)  –                                                                                      ( 35 गुण)

       

यामध्ये अभियानाबद्दल जाणीव जागृती, नागरीकांचे ऑनलाईन अभिप्राय,प्रभावी व्यक्तींचे अभिप्राय घेतले जाणार आहे.

क) स्वच्छता विषयक सद्यस्थिती-स्वच्छतेसंबंधीची विविध मानकांची जिल्हयांने केलेली प्रगती-    ( 35 गुण)

यामध्ये प्रामुख्याने स्वच्छतेचे प्रमाण, हागणदारी मुक्तीची टक्केवारी, हागणदारी मुक्त पडताळणी टक्केवारी, फोटो अपलोडींग व नादुरुस्त शौचालयांची उपलब्धता यांचे गुणांकन होणार आहे.

या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उप. मु. का.अ (पा. व स्व.) यांनी केले तर स्वच्छता सर्वेक्षणाबाबत सविस्तर माहिती श्री. विजय पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, पाणी व स्वच्छता यांनी दिली. या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, उपअभियंता (ग्रा.पा.पु.) गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सर्व तज्ञ व सल्लागार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मा. श्री. संजय कुंभार, लेखाधिकारी, (पा. व स्व.) यांनी मानले व कार्यक्रम संपला.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

दिनांक  23/07/2018 इ.रोजी  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरीबाबत.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 23/07/2018 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी श्री.मधुकर पोवार,वरिष्ठ सहाय्यक (साप्रवि), श्री.विजय मगदुम,वरिष्ठ सहाय्यक (अतिमुकाअ स्वीय.सहा.) व श्रीम. सुरेखा खटावकर,कनिष्ठ सहाय्यक  (शिक्षण विभाग प्राथमिक)  यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.

या प्रसंगी  उप मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री. राहुल कदम यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांचे  व कार्याची माहिती थोडक्यात सांगितली. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री.रविकांत आडसुळ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) श्री.राजेंद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), श्री.सोमनाथ रसाळ, कार्यकारी अभियंता (ग्रापापु) श्री.एम.एस.बसर्गेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्रीम. जयश्री संजय जाधव विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत तिस-या प्रवेश फेरीसअंतिम मुदत वाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण झालेल्याअसून सध्या तिसरी प्रवेश फेरी चालू आहे. तिस-या फेरीतील प्रवेशासाठी निवडलेल्या 643 विद्यार्थ्यांची यादी RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आलेली आहे. तसेच सदर विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत.SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 02/07/2018 पर्यंत एकूण 436 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. 42 विद्यार्थ्याचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेले असून अद्याप 165 अर्ज प्रलंबित आहेत. तिस-या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 02/07/2018 होती. मात्र पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 08/07/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे.त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही.तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केलेले आहे.

 

 

sd/-

                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                        जिल्हापरिषदकोल्हापूर