जिल्हा स्तरीय विद्यार्थी अध्यक्ष चषक क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग ( प्राथमिक ) मार्फत सन 2017-18 च्या जिल्हास्तरीय  अध्यक्ष चषक क्रिडा स्पर्घा, दिनांक 27/12/2017 ते 29/12/2017 अखेर या कालावधीत यशंवतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर, कोडोली येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद कोल्हापूर च्या अध्यक्षा, सौ शैामिका महाडिक व डॉ श्री.कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, कोल्हापूर, यांच्या शुभहस्ते झाले. तसेच या कार्यक्रमांस मा. श्री सर्जेराव पाटील उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर मा. श्री अबंरिषसिंह घाटगे, सभापती, शिक्षण व अर्थ समिती जिल्हा परिषद, कोल्हापूर              मा, श्री. विशांत महापूरे, सभापती समाजकल्याण समिती जि.प कोल्हापूर, मा श्री. सर्जेराव पाटील (पेरिडकर) सभापती, बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद कोल्हापूर मा सौ शुभांगी शिंदे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प कोल्हापूर, श्री सुभाष चौगुले शिक्षण अधिकारी (प्राथमिक), श्रीम सुरेखा शहापुरे, प्राचार्य, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर  इ. अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी जिल्हयातील माध्यमिक शाळेतील क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून कामकाज पाहिले. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पन्हाळा गटाने सलग दुस-यांदा पटकविले तर उपविजेते पदाचा बहुमान करवीर व राधानगरी गटांने पटकविला. बक्षिस वितरण संभारंभ शिक्षणाधिकारी श्री सुभाष चौगुले व श्री बी .एम. कासार, उपशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थिती पार पडला.

सदरस्पधेच्यायशस्वीतेसाठीशिक्षणविस्तारअधिकारीसौजे.एस.जाधव,श्रीजे.टी.पाटीलश्रीएम.आय.सुतारवश्रीडि.सीकुंभार,कनिष्ठसहाश्रीएस.डीपाटीलश्रीराजूकांबळेयांनीविशेषपरिश्रमघेतले.

             (सुभाष चौगुले)

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

कायापालट, राष्ट्रीय मानांकन बोर्ड (NABH) यशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन मानांकन (NQAS) दिशेने वाटचाल

कायापालट, राष्ट्रीय मानांकन बोर्ड (NABH) यशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन मानांकन (NQAS) दिशेने वाटचाल

 

पुस्तकांचेभव्यप्रदर्शनवसवलतीच्यादरातविक्री

नॅशनलबुकट्रस्टइंडिया,मानवसंसाधनविकासमंत्रालय,शिक्षणविभाग,भारतसरकारवप्राथमिकशिक्षणविभाग,जिल्हापरिषदकोल्हापूरयांच्यासंयुक्तविद्यमानेपुस्तकांचेभव्यप्रदर्शनदि.15व16जानेवारी2018रोजीजुनेसभागृह,कागलकरहाऊस,जिल्हापरिषदकोल्हापूरयेथेसकाळी10.00ते5.00यावेळेतआयोजितकरणेतआलेआहे.

सदरप्रदर्शनाचेउद्घाटनसमारंभमा.श्री.प्रभुनाथशुक्ला,उपविभागीयअधिकारी,वनविभागकोल्हापूरयांचेशुभहस्तेवमा.डॉ.कुणालखेमनार,मुख्यकार्यकारीअधिकारी,जिल्हापरिषद,कोल्हापूरयांचेप्रमुखउपस्थितीतसंपन्नझाला.सदरकार्यक्रमासजिल्हापरिषदेचेसर्वखातेप्रमुखहीउपस्थितहोते.

याप्रसंगीबोलतानामा.मुख्यकार्यकारीअधिकारीयांनीजिल्हापरिषदेचेसर्वअधिकारी/कर्मचारी,जिल्हापरिषदेच्यासर्वप्राथमिकशाळांतीलमुख्याध्यापक/शिक्षक,ग्रामपंचायतसरपंच/सदस्य,पंचायतसमितीसभापती/सदस्य/सर्वशासकीयअधिकारीयांनीसदरप्रदर्शनाचालाभघ्यावाअसेआवाहनकेले.याप्रसंगीनॅशनलबुकट्रस्टइंडियाचेपुस्तकप्रदर्शनप्रमुखश्री.रत्नाकरनिर्भवणेयांनीजिल्हापरिषदशाळावकर्मचारीयांनापुस्तकखरेदीवर25%सवलतवइतरसर्वांना10%सवलत देणेत येणारअसलेचेसांगितले.तसेचत्यांनीत्यांच्याविविधयोजनांबाबतमाहितीदिली.

याप्रदर्शनाससौ.शौमिकामहाडीक,अध्यक्ष,जिल्हापरिषद,कोल्हापूरवश्री.अमरिशसिंहघाटगे,सभापती,शिक्षणवअर्थ समिती, जिल्हापरिषद,कोल्हापूरयांनीभेटदिली.तसेचजिल्हापरिषदेचेअधिकारीवकर्मचारी,शाळांतीलमुख्याध्यापक,शिक्षकवविद्यार्थीयांनीहीसदरप्रदर्शनासभेटदिली.सदरप्रदर्शनाचेसर्वनियोजनजिल्हापरिषदेचे प्राथमिकशिक्षणाधिकारीश्री.सुभाषचौगुलेयांच्यामार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारीश्री.एम.आय.सुतार, श्री.जे.टी.पाटील, श्रीम.जयश्रीजाधव, श्री.डी.सी.कुंभार, कनिष्ठ अभियंता श्रीम.सुप्रियाजोगळेकर व संशोधन सहाय्यक श्रीम.विद्यावर्मायांनीकेले.

 

 

 

(सुभाषचौगुले)

 शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

 जिल्हापरिषदकोल्हापूर

राजमाता जिजामाता यांची ४२० वी व स्वामी विवेकानंद यांची १५५ वी जयंती साजरी केलेबाबत.

 

राजमाता जिजामाता यांची ४२० वी व स्वामी विवेकानंद  यांची १५५ वी जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १२/०१/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. डॉ. हरिष जगताप, प्रकल्प संचालक (डीआरडीए) व मा. श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री. दत्तात्रय केळकर, अधिक्षक सामान्य प्रशासन व सौ. प्रतिमा पाटील, कनिष्ठ सहाय्यक (ग्रापापु) यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले. यावेळी मा. श्री. बंडा माने (जि.प. सदस्य) यांनी राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद  यांचे विषयी माहिती सांगितली. याप्रसंगी मा. डॉ. हरिष जगताप, प्रकल्प संचालक यांनी मार्गदर्शन केले.

राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सांगितली.

यावेळी मा. श्री. राहुल कदम, उपमुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी, मा. श्री. सोमनाथ्‍ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, कृषि अधिकारी, श्री. डॉ. संजय शिंदे, पशु संवर्धन अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

तरी सदरची बातमी आपलेमार्फत जिल्हयातील लोकप्रिय दैनिकांतून प्रसिध्द करणेत यावी.

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेसाठीचे दरपत्रक मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून गावाची निवड करुन निवडलेल्या गावांतील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन  Antirebis vaccine  व जंतनाशक औषधे देण्यात येणार आहे.

आपले कमीत कमी दराचे जिल्हयामध्ये निवडलेल्या गावात जावून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन  Antirebis vaccine व जंतनाशक औषधे देण्यासाठीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने  दि.6/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्यांचे शस्त्रक्रियेनंतरचा उपचार व पाठपुरावा संबंधीत संस्थेने करणेचा आहे.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत 190 लि. क्षमतेचे रेफ्रिजरेटरचे दरपत्रकाबाबत.

 

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून  190 लि. क्षमतेचे रेफ्रिजरेटर खरेदी  करण्यात येणार आहेत.

आपले कमीत कमी दराचे 190 लि. क्षमतेचे नामांकित कंपनी उदा. गोदरेज, सॅमसंग, व्हर्लफुल, एलजी, हायर इ. रेफ्रिजरेटर खरेदीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पशुवैद्यकिय दवाखान्याच्या ठिकाणी पोहोच दराने  दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 पर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच पुरवठा केलेल्या शितपेटयांची 1 वर्षासाठी देखभाल दुरुस्ती संबंधीत पुरवठादाराने करणेचा आहे.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत डिस्पोजिबल निडल्स 18G ( Plastic mounted 18 x 1.5 inch) खरेदीसाठी दरपत्रकाबाबत.

 

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून  डिस्पोजिबल निडल्स 18G ( Plastic mounted 18 x 1.5 inch) खरेदी  करण्यात येणार आहेत.

आपले कमीत कमी दराचे डिस्पोजिबल निडल्स 18G ( Plastic mounted 18 x 1.5 inch) खरेदीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पशुवैद्यकिय दवाखान्याच्या ठिकाणी पोहोच दराने  दि.    16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत युपीएस खरेदीसाठी दरपत्रक मिळणेबाबत.

 

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून   युपीएस वुईथ एव्हीआर 20 मिनिट बॅकअप खरेदी  करण्यात येणार आहेत.

आपले कमीत कमी दराचे युपीएस वुईथ एव्हीआर 20 मिनिट बॅकअप खरेदीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने  दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच पुरवठा केलेल्या युपीएसचे  1 वर्षासाठी देखभाल दुरुस्ती संबंधीत पुरवठादाराने करणेचा आहे.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत  विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे या योजनेअंतर्गत तलंगा खरेदीसाठी दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे  या योजनेअंतर्गत 12 आठवडयाच्या तलंगा खरेदी  करण्यात येणार आहेत.

आपले कमीत कमी दराचे  12 आठवडयाच्या देशी / देशी सुधारीत जातीच्या तलंगांचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  दि. 16/01/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

 

 

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow.Vita AD3, E, B12 खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement)  खरेदी करण्यात येणार आहेत.

 

Each 5 gms contain

Vita A- 50000 IU

Vita D3- 5000IU

Vita E -5 mg

Vita B12- 50mcg

 

आपले कमीत कमी दराचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement)   चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  पोहोच दराने  दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.              कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.