जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदी करण्यात येणार आहेत.

Calcium & Vitamin Suppliment 1 lit

Each 100 ml containt

Calcium- 3500 mg

Phosphorus 1750 mg

Magnesium 200 mg

Vit D3 60,000 IU

Vit B 12- 200mcg

आपले कमीत कमी दराचे वरील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  पोहोच दराने  दि. 16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Bol. Estrona pack of 10 bolus खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत Bol. Estrona pack of 10 bolus खरेदी करण्यात येणार आहेत.आपले कमीत कमी दराचे Bol. Estrona pack of 10 bolus चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  पोहोच दराने  दि. 16/1/2018 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

 

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow Inorganic phosphorus feed suppliment pack of 50 gms खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत Pow Inorganic phosphorus feed  suppliment pack of 50 gms खरेदी करण्यात येणार आहेत.आपले कमीत कमी दराचे Pow Inorganic phosphorus feed supplement pack of 50 gms (each gm containing 250 mgs of Inorgainc Phosphorus  Powder) चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  पोहोच दराने  दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ

जिल्हा नियोजन समिती  मार्फत 2016-17  नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम  जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक यांचे हस्ते राजर्षि शाहू छत्रपती सभागृह येथे दिपप्रज्वलाने संपन्न झाला. या प्रसंगी  आरोग्य बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव बंडू पाटील (पेरीडकर) ,  पंचायत समिती करवीरचे सभापती श्री. प्रदीप झांबरे, आरोग्य समिती सदस्या सौ. पुप्पा वसंत आळतेकर, सौ. सुनिता रमेश रेडेकर , डॉ एल एस पाटील , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरज पवार, कॅन्सर तज्ञा, ॲपल सरस्वती कॅन्सर हॉस्पीटल च्या अवटी मॅडम  तसेच पंचायत समिती करवीर चे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रसंगी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पाटील यांनी  नाविन्यपूर्ण योजना असून यामध्ये आशाचे कॅन्सर तज्ञा मार्फत प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जावून आशा मार्फत सव्हेक्षण, आरोग्य शिक्षणसाठी माहिती देण्यात येणार आहे. संशयित रुग्णांचे  कॅन्सर तज्ञांचे शिबीर आयोजन करुन, आवश्यक तपासणी , उपचार बाबत माहिती दिली. 

योजनेचा करवीर तालुक्याचा कृती आराखडा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. कुणाल खेमनार यांचे मागदर्शनाखाली तयार करणेत आला आहे असे  तालुका आरोग्य अधिकारी  डॉ नलावडे यांनी सांगितले. तालुक्याच्या सहा प्रा.आ.केंद्राच्या ठिकाणी कॅन्सरचे शिबीर घेण्यात येणार आहे.  या प्रसंगी जेष्ठ कॅन्सर तज्ञ डॉ सरज पवार उपस्थित होते त्यांनी  कॅन्सरचे रुग्ण वाढले असून तंबाखु  हे कॅन्सरचे प्रमुख कारण आहे.  कॅन्सर तज्ञांमार्फत आशा प्रशिक्षण घेण्यात येणार असून गर्भाशय मुख कॅन्सर,  स्तन कॅन्सर, मुख कॅन्सर ची माहिती दिली.

       आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सौ. शौमिका महाडिक म्हणाल्या, संतुलित आहार, नियमित व्यायाम,  सुदृड जीवनशैली  आणि व्यसनापासून दूर राहणे हा कॅन्सर प्रतिबंधाचे महत्व नमुद केले. तसेच आशा हया सर्व सामान्याच्या आशा असून त्यांनी या नाविन्यपूर्ण योजनेत हिरहिरीने सहभाग नोंदवावा.  पंचायत समिती करवीरचे सभापती यांनी सदरची योजना तालुक्यातमध्ये चांगल्या प्रकारे राबविण्यात येईल असे सांगितले.

       उपस्थितांचे आभार डॉ.फारुख देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी केले. डॉ उषादेवी कुंभार, अति. जि.अ.अ व पंचायत समिती करवीरचे अधिकारी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

पल्स पोलीओ मोहिम 28 जानेवारी 2018 करीता आरोग्य विभाग सज्ज

पल्स पोलीओ मोहिम दि.28 जानेवारी 2018 यशस्वीरित्या राबविण्याच्या दृष्टीेने दि.5 जानेवारी 2018 रोजी जिल्हा समन्वय समितीची सभा मा.श्री नंदकुमार काटकर, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली व मा.डॉ कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे उपस्थितीमध्ये घेण्यात आली सदर सभेमध्ये पल्स पोलीओ मोहिम यशस्वीरित्या राबविणेसाठी करणेत आलेली उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली 0 ते 5 वयोगटातील जिल्हयातील 335489 बालकांना पोलीओ डोस देण्यात येणार आहे. याकरीता ग्रामीण भागासाठी 1630 नागरी भागासाठी 198 व कोमनपा साठी 173 असे एकुण जिल्हयामध्ये 2001 पोलीओ बुथची स्थापना करणेत आलेली आहे. दि.26 ते 28 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटटी विचारात घेऊन बुथवर डोस चुकलेल्या व प्रवासामध्ये असलेल्या बालकांसाठी एस टी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, टोल नाके या ठिकाणी 314 ट्रान्झीट टिमची व उसतोड मजुर वस्ती विट भटटी, स्टोन क्रशर, बांधकाम साईट, भटक्या वसाहतीसाठी 669 मोबाईल टिमची स्थापना करणेत आलेली आहे.

दि.28 जानेवारी 18 च्या पोलीओ लसीकरणानंतर जर काही बालके लसीपासुन वंचीत राहिलेली असतील त्यांचेसाठी घरोघर सर्व्हेक्षण करुन त्यांना पोलीओ लस पाजणेसाठी जिल्हयामध्ये एकुण 2427 टिम तयार करणेत आलेल्या आहेत अशा टिम 3 -4 दिवस घरोघरी जाऊन डोस चुकलेल्या बालकांचा शोध घेऊन पोलीओ डोस पाजणार आहेत. मोहिम यशस्वीपणे राबविणेसाठी जिल्हयात 7703 कर्मचारी नियुक्त करणेत आलेले असुन 1188 पर्यवेक्षक नियुक्त करणेत आलेले आहेत.

सदर मोहिमेसाठी 420000 पोलीओची लस जिल्हयासाठी प्राप्त झालेली आहे. प्रत्येक तालुक्यास त्यांचे मागणीनुसार पुरवठा करणेत येत आहे.

मोहिम काळात ज्यादा वाहनांची आवश्यकता असलेने मा.जिल्हाधिकारी यांचेमार्फत वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच मोहिमेच्या व्यापक प्रसिध्दीकरीता जिल्हाधिकारी कार्यालय करमणुक विभागामार्फत केबल टिव्ही, सिनेमागृह याद्वारे प्रसिध्द करणेत येणार आहे.

पल्स पोलीओ समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येत आहे की, आपल्या घरातील व परिसरातील 0 ते 5 वयोगटातील एकही बालक पोलीओ डोस पासुन वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.

सदर सभेस मा.डॉ कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ एल एस पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ प्रकश पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, डॉ विलास देशमुख, निवासी वैद्यकिय अधिकारी (बाहयसंपर्क) सीपीआर हॉस्पिटल,श्री सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) डॉ अरुन वाडेकर, आरोग्य अधिकारी कोमनपा, डॉ हेमंत खरनारे सर्व्हेलन्स ऑफिसर गोवा, सहायक आयुक्त समाजकल्याण, प्रादेशीक परिवहन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमीक) तसेच डॉ आर एस पाटील पोलीओ डायरेक्टर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेन हे उपस्थित होते. डॉ एफ ए देसाई जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आभार मानले.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर

 

प्लास्टिक बंदी व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती उपक्रम

प्लास्टिक बंदी व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती उपक्रम

प्राथमिक आरोग्यकेंद्र निवडे व चिखली यांची राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यामध्ये निवड

कोल्हापूर जिल्हयामध्ये गुणवत्ता आश्वासन उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय मानांकनाकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे ता. गगनबावडा व चिखली ता. कागल या 2 प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झालेली होती. जिल्हयातील 18 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गुणवत्ता आश्वासन गटाद्वारे 2 प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात आलेली होती. या संदर्भात राष्ट्रीयस्तरावरुन कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाला पत्र पाठवून कळविण्यात आलेले आहे. या उपक्रमाअंतर्गत आरोग्य संस्थेमधील सहा विभागाची तपासणी करण्यात येते. या विभागातील संबधीत विविध बाबीची तपासणी करण्यात येते. वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यानी राष्ट्रीय गुणवत्ता मुल्याकंना करीता स्थानिक पातळीवर पुर्तता करणे अपेक्षित असते व परिक्षणानंतर गुणाच्या आधारावरुन व परिक्षकाच्या अहवालावरुन मानांकन जाहीर केले जाते. या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.
या 2 प्राथमिक आरोग्य केंद्राना प्रमाणपत्र मिळण्याकरीता मा. सौ. शौमिका महाडीक, अध्यक्षा जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. सर्जेराव पाटील (पेरीडकर) सभापती बांधकाम व आरोग्य समिती, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, अति. जि.आ.अ. डॉ. यु.जी. कुंभार, जि.मा.बा.स.अ. डॉ. एफ. ए. देसाई यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले तसेच कार्यक्रमाकरीता आवश्यक पुर्तता जिल्हा गुणवत्ता आश्वासन गटामार्फत डॉ. स्मिता खंडारे, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक श्री. मंदार विनवडे व कार्यक्रम सहाय्यक श्री. विलास हराळे यांनी केले आहे.

आपलास्नेहाकिंत

जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर

मुख स्वास्थ तपासणी मोहिमेची सांगता

मुख स्वास्थ हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. त्याच प्रमाणे मुख स्वास्थ्य जर व्यवस्थित ठेवले तर पुढील अनेक आजरा पासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो. मौखिक कर्करोग जर सुरुवातीच्या अवस्थेत ओळखला तर भविष्यात गंभीर कर्करोगात रुपांतर होण्यापासून रोखता येवू शकते. तंबाखू सेवन हे मुख कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
आरोग्य विभागा मार्फत दिनांक 1 डिसेंबर 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत मुख स्वास्थ्य तपासणी मोहिम राबविण्यात आली. कालावधीत जिल्हयातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची तपासणी करणेत आली आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत 74 प्राथमिक आरोग्य केंद्र, 413 उपकेंद्रा मार्फत या कालावधीत मुख्य स्वास्थ्य तपासणी करण्यात आली. मोहिम कालावधीमध्ये एकुण 865681 इतक्या नागरिकांची मौखीक आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या नागरिकां पैकी मद्य सेवन करणारे-60458 , तंबाखू/ सुपारी सेवन करणारे 116539 लोक आहेत. या कालाधीत तपासणी मध्ये मुख स्वास्थ्यकडे दुर्लक्ष होत असलेचे दिसून येते. तोंड उघडता न येणारे 399 रुग्ण आहेत. पांढरा/लाल चट्टा – 794 , त्वचा जाडसर असणा-यांची संख्या – 205 , पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस बरा न होणारा ब्रण 39 रुग्ण आहेत. एकुण 1280 रुग्णांना तपासणी अंती संदर्भित केले आहे. तपसणी मध्ये धोक्याचे लक्षणे आढळणा-या रुग्णांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी आरोग्य शिक्षण देण्यात आले.
या मोहिमे मध्ये जिल्हया परिषदेच्या मुख्यालयातील तपासणीसाठी मा. डॉ कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी , डॉ प्रकाश पाटील जि.आ.अ व सर्व अधिकारी , कर्मचारी यांनी तपासणी करुन घेतली. उदघाटन कार्यकमास डॉ हरिष जगताप, प्रकल्प संचालक, डॉ एल.एल. पाटील जिल्हा शल्यचिकित्स, डॉ उषादेवी कुंभार, प्र अति. जि.आ.अ, उपस्थित होते. प्रसिध्द कॅन्सर रोग तज्ञ डॉ सुरज पवार यांनी कॅन्सर बाबत मार्गदर्शन केले. डॉ देसाई, प्र. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी आभार व्यक्त केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. ०३/०१/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरा करणेत आला. त्या प्रसंगी मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. श्री. इंद्रजित देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सौ. हेमांगी जाधव, कृषि अधिकारी यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले. यावेळी मा. श्री. इंद्रजित देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनातील प्रसंग व त्यांचे समाज विकासातील योगदान सांगितले. यावेळी मा. श्री. डॉ. हरिष जगताप, प्रकल्प संचालक, मा. श्री. राजेंद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त् अधिकारी, मा. श्री. सोमनाथ् रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, कृषि अधिकारी, मा. श्री. सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनपटाबाबत संपूर्ण माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सांगितली. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
तरी सदरची बातमी आपलेमार्फत जिल्हयातील लोकप्रिय दैनिकांतून प्रसिध्द करणेत यावी.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर. 3 डिसेंबर, 2017 जिल्हा परिषद व रोटरी होरायझन यांचेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला-मुलींच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन.

दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस जगभर जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा होतो.

 

या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 3 डिसेंबर रोजी किंवा त्या दरम्यान सर्वत्र अपंगांसाठी मार्गदर्शन, वैद्यकीय तपासणी, चिकित्सा, सांस्कृत्तिक मेळावे,  अपंग व्यक्तींची उत्पादने व त्यांची प्रदशने, रोजगार मेळावे, जनजागृती इत्यादि स्वरुपाचे सामाजिक कार्यक्रम मोठया प्रमाणात आयोजित केले जातात.  अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवून अपंग व्यक्तींना सर्व सामान्य व्यक्तींच्या बरोबरीने आपले जीवन जगता यावे.  यासाठी प्रेरित केले जाते व समाजाचे प्रबोधन केले जाते.  या दिनाच्या निमित्ताने दरवर्षी कोल्हापूर जिल्हयातील सर्व अपंगांच्या कायमस्वरुपी अनुदानित/विना अनुदानित विशेष शाळांच्यामधील विद्यार्थ्यांच्या (8 ते 25 वयोगटातील) क्रिडास्पर्धाचे आयोजन केले जाते.

 

जिल्हा स्तरावरील यशस्वी विद्यार्थीं (खेळाडू) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविला जातो.  कोल्हापूर जिल्हयातील अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवून अनेक विक्रम प्रस्तापित केले आहेत.  यामध्ये कोल्हापूरचा नावलौकिक कायम आहे.  या विद्यार्थ्यांच्या यशामागे अपंग शाळांतील क्रिडा शिक्षक व कर्मचारी यांचे सातत्य पूर्ण प्रयत्न, मार्गदर्शन हेही तितकेच मौलाचे आहे.

 

दरवर्षीं जिल्हास्तरीय स्पर्धांचे नियोजन हे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,कोल्हापूर यांच्यामार्फत केले जाते.  यावर्षी रविवार, दिनांक 3 डिसेंबर 2017 रोजी पोलिस ग्राऊंड, कसबा बावडज्ञ, कोल्हापूर या ठिकाणी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंत स्पर्धा होणार आहेत.  या स्पर्धेचे 300 विद्यार्थीं, 150 कर्मचारी जिल्हयातून सहभागी होत आहेत.  या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन हे जिल्हा समाजकल्याण कार्यालय,जिल्हा परिषद, कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी भोजन, नाष्टा, बक्षिय इत्यादि सुविधा क्लबमार्फत करण्यात आली आहे.