RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत प्रवेश फेरीस मुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत दि. 07/03/2018 अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त      झाले आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे पहिल्या फेरीतील RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र 599 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 599 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 23/03/2018 पर्यंत एकूण 229 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. एकाविद्यार्थ्याचा अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेला असून अद्याप 369 अर्ज प्रलंबित आहेत. पहिल्या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 24/03/2018 होती. मात्र पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 31/03/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

 

 

                                                        शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                          जिल्हापरिषद,कोल्हापूर

 

Leave a Comment